IMPIMP

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, ”…यावेळी सत्ता येताच लगेच मुख्यमंत्री झाले”

by sachinsitapure
CM Eknath Shinde Uddhav Thackeray

खेड : CM Eknath Shinde | २०१९ ला खोटे बोलून भाजपाबरोबरची (BJP) नैसर्गिक युती तोडली तेव्हाच बंडाचा निर्णय घेतला असता. पण, आम्ही तसे काही केले असते तर शिवसेना (Shiv Sena) रसातळाला गेली असती. म्हणून आम्ही तेव्हा तसा निर्णय घेतला नाही. १९९५ ला शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना वाटले असते तर ते तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. परंतु, यावेळी सत्ता येताच लगेच मुख्यमंत्री झाले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

एकनाथ शिंदे गटाचा (Eknath Shinde Group) मेळावा आज खेड येथे घेण्यात आला.
यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. एकनाथ शिंदे म्हणाले, पक्षात सातत्याने इन्कमिंग चालू आहे.
शुक्रवारी परभणीत ५० नगरसेवकांनी प्रवेश केला. मुंबईत रोज प्रवेश चालू आहेत. लोकप्रतिनिधी, शिवसैनिक विश्वासाने येत आहेत. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांचा विश्वास सार्थ करू.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, सत्तेचा लोभ मनात ठेवून काहीजण पक्ष सोडतात.
मी सत्तेचा लोभ मनात ठेवून निर्णय घेतला नव्हता. मी प्रामाणिकपणे भूमिका घेतली.
पक्ष वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचे खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घेतली.
मला कधीही पदाचा, सत्तेचा मोह नव्हता, आजही नाही.

त्यावेळी मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्याबरोबर सात-आठ मंत्री होते. आम्ही सगळ्यांनी सत्तेवर लाथ मारली.
केवळ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकण्यासाठी आम्ही हे सगळे केले. बंड करायचेच असते तर आम्ही ते २०१९
लाच केले असते. मी बाळासाहेबांचा शिवेसैनिक आहे, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Posts