IMPIMP

CM Eknath Shinde Vs Shivsena | ‘मुले पळवणारी टोळी ऐकलेय, पण बाप…’, शिंदे गटाविरोधात फलकबाजी; नवरात्र मंडळाचे फलक पोलिसांनी हटवले

by nagesh
Eknath Shinde | Uddhav Thackeray's mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde - Jayakumar Gore

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde Vs Shivsena | एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत केलेल्या बंडखोरीचे पडसाद अजूनही
उमटत असून शिवसैनिक (Shiv Sainik) आपला संताप वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच धारावीत शिवसेना आणि शिंदे
गटात (Shinde Group) शिवीगाळ झाली होती. आता येथे पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटाविरोधात फलक लावण्यात आले होते. पोलिसांनी हा फलक
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत काढून घेतला. (CM Eknath Shinde Vs Shivsena)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईतील धारावी परिसरातील एका नवरात्र उत्सव मंडळाने (Navratri Festival Mandal), मुले पळवणारी टोळी ऐकली आहे, पण बाप पळवणारी टोळी पहिल्यांचा बघतोय, असा मजकूर असलेला फलक लावला होता. या फलकामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून संबंधीत फलक काढण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला.

 

सरवणकर गटाची गुरूवारी बैठक धारावी मील कंपाऊंड येथे मॉर्निंग स्टार शाळा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुन्हा वाद झाला. ही बैठक संपल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले गेले.

 

त्यानंतर धारावी पोलिसांनी याप्रकरणी राजेश सुर्यवंशी (Rajesh Suryavanshi), मुथू पठाण (Muthu Pathan), चेतन सुर्यंवशी (Chetan Suryavanshi) यांच्यासह इतर 4-5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता. धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविध कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामुळे प्रभादेवीनंतर धारावी येथील राजकीय वातावरण तापले असून पोलीस सतर्क झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde Vs Shivsena | police taken action on the navratri group that put up banners against the shinde group in dharavi mumbai

 

हे देखील वाचा :

Health Advice | ‘या’ 4 भाज्या चुकूनही खाऊ नका कच्च्या, अर्धेकच्चे अन्न खाल्ल्याने होतात अनेक गंभीर आजार; दुर्लक्ष केले तर होईल पश्चाताप

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांकडून विधानाची सारवासारव, म्हणाले… (व्हिडिओ)

T20 World Cup | ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला नावावर, टी-20 वर्ल्डकपच्या आधी भारताने पाकिस्तानला दिला झटका

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

 

Related Posts