IMPIMP

Crime News | धक्कादायक ! विष प्राशन करुन बँक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या, 7 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; सुसाईट नोटमध्ये असं लिहिलं की…

by nagesh
Crime News | married couple commit suicide and left a emotional suicide note

इंदूर : वृत्तसंस्था Crime News | इंदूरमधील (Indore) एक धक्कादायक घटना समोर (Crime News) आली आहे. येथील एका बँक कर्मचाऱ्याने (Suicide of Bank Employee) आणि त्याच्या पत्नीने विष प्राशन केलं. मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान रुग्णालयात नेत असताना पतीचा मृत्यू झाला, तर बुधवारी सकाळी पत्नीचा मृत्यू (Died) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विष (Poison) प्राशन करण्यापुर्वी त्यांच्या रुममध्ये चिठ्ठी आढळुन आली. यामध्ये आयुष्याला कंटाळून आत्महत्या (Married Couple Commit Suicide) केल्याचं नमूद केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, मोनू गुप्ता (Monu Gupta) आणि अंजली (Anjali) असं पती पत्नीचे नाव आहे. अंजली ही मूळची बेटमाची, तर मोनू मुसाखेडी परिसरातील रहिवासी होता. एप्रिलमध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच दोघेही मुसाखेडी येथून लसुडिया परिसरात राहू लागले. त्या दोघांनी मंगळवारी संध्याकाळी विष प्राशन केले. यानंतर वेदनेने तडफडत ते फ्लॅटच्या बाहेर आले. शेजाऱ्यांनी 100 वर तक्रार केली होती. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अंजलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तिचाही उपचारादरम्यान मृत्यू (Died) झाला. दोघांचं याच वर्षी विवाह झाला होता. मोनू हा कोटक महिंद्रा बँकेत कामाला होता. त्याच्या घरात बँकेचे कार्डही आढळून आले आहे. (Crime News)

दरम्यान, पोलिस उपनिरिक्षक गौरव तिवारी (PSI Gaurav Tiwari) आणि एफआरव्ही कॉन्स्टेबल गौतम पाल (Constable Gautam Pal) घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा त्या कपलच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये म्हटलं आहे की, आयुष्यात खूप अडचणी आहेत. आता जगायची इच्छा नाही, स्वेच्छेने जीव देत आहोत. गावातच अंत्यसंस्कार करावेत. तसेच, सुसाईड नोटमध्ये (Suicide note) अंजलीने लिहिलं की तिला नववधूप्रमाणे सजवावं आणि नवरीच्याच वेशभूषेत तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, या आत्महत्येमागे (Suicide) कर्जबाजारीपणा असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर, पोलिसांनी दोघांचा मोबाईल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. या घटनेबाबत पोलिस (Police) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Crime News | married couple commit suicide and left a emotional suicide note

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Mumbai | गेट जामीन करण्यासाठी लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना

Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

 

Related Posts