IMPIMP

Crime News | ‘तनिष्क’च्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
Crime News | tanishqs salesgirl shot dead woman dies on the spot bihar crime news

पटना : वृत्तसंस्थाCrime News | बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालयाच्या (Begusarai District Headquarter) लोहियानगर सहायक पोलीस ठाणे (Lohianagar Assistant Police Thane) हद्दीत एका महिलेचा अज्ञातांनी गोळ्या (Firing) घालून खून (Murder) केला. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री घडली आहे. मृत महिला ही तनिष्काच्या शोरुममध्ये (Tanishq Showroom) सेल्सगर्ल (Salesgirl) म्हणून काम करत होती. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन महिलेचा जागीच मृत्यू (Shot Dead) झाला. नेहा देवी (Neha Devi) असे मृत महिलेचे नाव असून दोन वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती आपल्या माहेरी (Bihar Crime) राहत होती. (Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कामावरुन घरी जात असताना झाला हल्ला
नेहा देवी या शनिवारी रात्री तनिष्कच्या शोरुममध्ये ड्यूटी संपल्यानंतर स्कूटर वरुन घरी जात होत्या. यादरम्यान पनहास चौकात (Panhas Chowk) दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी नेहा यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या नेहा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. (Crime News)

 

लोकांकडून संताप व्यक्त
घटनेची माहिती मिळताच पोलिस (Begusarai Police) घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नेहा हिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की, शहरामध्ये खूनांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. परंतु पोलिसांकडून कोणतीच ठोस कारवाई होताना पहायला मिळत नाही. बेगूसरायमध्ये पोलिसांकडून कडक कारवाई न केल्याने आरोपी अधिक सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Crime News | tanishqs salesgirl shot dead woman dies on the spot bihar crime news

 

हे देखील वाचा :

Menstrual Health Awareness | प्रेग्नंसी आणि MC च्या दरम्यान ब्रेस्टमध्ये होतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

Pune Minor Girl Rape Case | मामे भावाकडून 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार !

 

Related Posts