IMPIMP

Death Threat to Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी, २० कोटी दिले नाही, तर मारून टाकू

by sachinsitapure
Death Threat to Mukesh Ambani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – २० कोटी रुपये दिले नाही, तर मारून टाकू, अशी धमकी (Death Threat to Mukesh Ambani) अज्ञात व्यक्तीने उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलद्वारे दिली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या असून ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. (Death Threat to Mukesh Ambani)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

धमकीचा हा ईमेल २७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर आला. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या धमकीच्या या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत. (Death Threat to Mukesh Ambani)

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांना (Mumbai Police) याबाबत माहिती दिली असून याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Related Posts