IMPIMP

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

by sachinsitapure
Female Police Officer Suspended In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Female Police Officer Suspended In Pune | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी (Lalit Patil Drug Case) पुणे पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत API Savita Hanumant Bhagwat (नेमणुक कोर्ट कंपनी, मुख्यालय) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी गुरुवारी (दि.26) काढले आहेत. (Female Police Officer Suspended In Pune )

सविता भागवत यांची नेमणूक ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) करण्यात आली होती. भागवत यांनी ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेत असलेल्या बंदी आरोपींची झडती घेणे आवश्यक असताना त्यांनी झडती घेतली नाही. गुन्हे शाखेला आरोपी ललित पाटील याच्याकडे दोन मोबाईल आढळून आले. तसेच देखरेख अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना एक खासगी व्यक्ती आक्षेपार्ह सॅक घेऊन आरोपी ललित पाटील (Pune Drug Case) याला भेटण्यास गेला. कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याने ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाल्याचा ठपका ठेवत सविता भागवत यांनी निलंबित केले आहे. (Female Police Officer Suspended In Pune)

महिला सहायक पोलीस निरीक्षक सविता हनुमंत भागवत यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले आहे.
त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय सोडण्यापूर्वी अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस उपायुक्त मुख्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीमध्ये दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल.
निलंबन काळात खाजगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल. असे आदेशात नमूद केले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts