IMPIMP

Devendra Fadnavis | ‘कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात?’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

by nagesh
 Devendra Fadnavis | who exactly told you that oppose barsu refinery devendra fadnavis question to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव (Barsu Solgaon) परिसरातील प्रस्तावित रिफायनरीच्या सर्वेक्षणाला (Ratnagiri Refinery Survey) ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात ते तरी सांगा? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तेव्हाही श्रीमान ठाकरेंनी विरोध केला

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आपण एक लक्षात घेतले पाहिजे की ही जी रिफायनरी आहे यामध्ये केंद्र सरकारच्या (Central Government) तीन ऑईल कंपनीज एकत्रित येऊन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (Investment) करत आहेत. या गुंतवणुकीमुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मागच्या काळात नाणारलाही (Nanar Project) ही रिफायनरी करायचं ठरवलं तेव्हा श्रीमान उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर त्यांच्या हे उशिरा लक्षात आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलं आता पुन्हा तेच विरोध करत आहेत, अंस फडणवीस म्हणाले.

 

 

तर त्यांचा विरोध सहन करणार नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरीही आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांच्या मनात काही शंका असतील आणि जे खरे विरोधक असलतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत. भूमिपुत्रांवर कोणत्याही प्रकराचा अन्याय होणार नाही हा आमचा प्रयत्न असेल. मात्र, त्याचवेळी राजकारणापुरतं जे विरोध करत आहेत त्यांचा विरोध सहन केला जाणार नसल्याचा इशारा फडणवीसांनी विरोधकांना दिला.

 

 

हेरिटेज कातळ सोडून दिलं आहे

जी जमीन आपण निवडली आहे ती कातळ जमीन आहे. त्यातलं जे कातळ हेरिटेज आहे ते आम्ही सोडून दिले आहे. मुंबईतून येऊन प्रकल्पाला विरोध केला जात आहे, हे थांबलं पाहिजे. या महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होत आहे. कधी आरेला विरोध करायचा, कधी पोर्टला विरोध करायचा, कधी समृद्धी महामार्गाला (Samriddhi Highway) विरोध असं तुम्ही केलं आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुणाची सुपारी घेऊन विरोध

जे लोक विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहात. बरं प्रकल्प बाहेर गेला की बोंब मारायची आणि प्रकल्प येत असतील तेव्हा विरोध करायचा. तिथे माध्यमांनी जाऊन पाहिलं जालियनवाला वगैरे सारखी स्थिती नाही. कुठल्याही गोष्टी न पाहता माईंडलेस पद्धतीने का करता? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | who exactly told you that oppose barsu refinery devendra fadnavis question to uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Rajiv Gandhi Zoological Park Pune | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राणीही घेताहेत ‘ठंडा ठंडा कुल कुल’चा अनुभव ! ऊन आणि उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना; आहारातही बदल

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

MLA Ravindra Dhangekar | ‘शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग, कारण…’, रविंद्र धंगेकरांचा टोला

 

Related Posts