IMPIMP

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !

by nagesh
Disha Parmar Rahul Vaidya | rahul vaidya wishes wife disha parmar on birthday with glimpses of their gulmarg vacay see pics

सरकारसत्ता ऑनलाइन  – Disha Parmar-Rahul Vaidya | टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.राहुल वैद्यसोबत लग्न झाल्यानंतर तिचा पहिला वाढदिवस आहे. तिचे चाहते आणि मित्र तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहेत. लग्नानंतर दिशाचा पहिला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी हे जोडपं श्रीनगरला गेले आहे. दोघाचे इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ दोघांच्याही चाहत्याला (Disha Parmar-Rahul Vaidya) खुश करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

दिशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या टीव्ही शोमध्ये पंखुरीची तिने घरघरांत पोहचवली होती.या मालिकेत तिची आणि नकुल मेहताची जोडी लोकांना खूप आवडली होती.नकुल सोबतची तिची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना तितकीच आवडते म्हणून नकुल आणि दिशा सध्या ‘बडे अच्छे लगते हैं २’ या शोमध्ये दिसत आहे. (Disha Parmar-Rahul Vaidya)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

दिशाच्या वाढदिवसाच्या निमत्त पती राहुल वैद्य ने शेअर केली स्पेशल पोस्ट -:

 

 

दिशा आणि राहुल दोघेही सध्या काश्मीर मध्ये तिचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करताना दिसत आहेत. राहुल ने काश्मीरच्या बर्फ मध्ये तिच्या सोबत रोमँटिक फोटो काढून तिच्या साठी खास मेसेज देखील लिहिला. त्याने लिहले की, ” या जगात फक्त एकच मुलगी आहे जिच्याशी मी लग्न करू शकलो असतो आणि ती तू आहेस. मागच्या वर्षी तुला याच तारखेला प्रपोज केल्यापासून आज हा दिवस तुझ्यासोबत तुझा नवरा म्हणून साजरा करण्या पर्यंतचा प्रवास खुप सुंदर आहे.”

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

राहुल वैद्य जेव्हा ‘बिग बॉस 14’ मध्ये होता, त्याचवेळी त्याने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. राहुलला सपोर्ट करण्यासाठी दिशाही ‘बिग बॉस’मध्ये पाहुणे म्हणून पोहोचली होती.

मागच्या वर्षी बिग बॉस 14 चा स्पर्धक असताना राहुल वैद्यने दिशा परमारला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रपोज केले होते. राहुलने दिशाला दिलेल्या क्यूट प्रपोजलचा व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी तो बोलला होता,
“आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि त्या मुलीचे नाव आहे दिशा परमार. देवा! मी इतका घाबरलो नाही. मला माहित नाही तुला विचारायला इतका वेळ का लागला – तू माझ्याशी लग्न करशील का?”

राहुल आणि दिशा यांचे 16 जुलै 2021 रोजी लग्न झाले. ते हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

 

Web Title: Disha Parmar Rahul Vaidya | rahul vaidya wishes wife disha parmar on birthday with glimpses of their gulmarg vacay see pics

 

हे देखील वाचा :

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amruta Fadnavis | ‘जाहीर माफी मागून ते ट्विट 48 तासांत डिलिट करा, अन्यथा…’, अमृता फडणवीस यांचा मलिकांना इशारा

 

Related Posts