IMPIMP

Eknath Khadse | विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी?; राजकीय हालचालींना वेग

by nagesh
Eknath Khadse NCP agitation against Girish Mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Khadse | राज्यसभेच्या (Rajya Sabha Elections) 6 जागांसाठी येत्या 10 जूनला तर विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. अनेक पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. विधान परिषदेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) गोटात देखील उमेदवारीवरून हालचाली सुरू आहेत. भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलेले एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह रामराजे निंबाळकर (Ramraje Nimalkar) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

 

एकनाथ खडसे अनेकवर्ष भाजपमध्ये होते. फडणवीस सरकारच्या काळात ते महसूल मंत्री देखील होते.
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. आणि अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं.
परंतु, राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही.
दरम्यान आता खडसेंना विधान परिषदेच्या जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp gives eknath khadse to mlc election 2022 candidature

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! पत्नीचा मृत्यू तर सासू गंभीर जखमी, शिरुरमध्ये प्रचंड खळबळ

HDFC Bank Hike MCLR | ‘या’ खासगी बँकेचा कर्जदारांना झटका ! RBI च्या पतधोरणाआधीच कर्जदर वाढवला

Nanded ACB Trap | वाळूचे टिप्पर चालू ठेवण्यासाठी घेतली 21 हजाराची लाच, खिशात सापडले 2.25 लाख, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 

Related Posts