IMPIMP

Eknath Khadse | मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी, एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत टाकला ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’

by nagesh
Eknath Khadse NCP agitation against Girish Mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) यांचं स्टिंग ऑपरेशन या पेन ड्राईव्हमध्ये होतं. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह डेटा (Pen Drive Bomb) जमा केला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावरील हल्ल्याचा तपासाचा मुद्दा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी ही चौकशी आयपीएस (IPS) अधिकाऱ्याकडे सोपवली होती. परंतु, पोलिसांनी उलट आरोपींना सहकार्य केलं असल्याचा आरोप खडसे यांनी केला. आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचे खडसे यांनी सांगितले.

 

तर दाद कोणाकडे मागावी

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तडिपार करण्याची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसा रद्द करण्यात आल्या. एका महिलेवर हल्ला होतो आणि आरोपींना संरक्षण दिले जाते. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. अशा गुंडांना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी असा सवालही त्यांनी केला. आपल्या आरोपांबाबतचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी सभागृहात सादर केला. खडसेंनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण लिखीत उत्तर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

 

काय आहे प्रकरण ?

रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदीच्या कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे जात होत्या.
सूतगिरणी परिसरात दोन दुचाकीवरुन आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला चढवला.
यावेळी वाहन चालकाने रस्त्यावरुन बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले.
त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरुप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader and mla eknath khadse criticize on cm eknath shinde on rohini khadse attack case maharashtra assembly session

 

हे देखील वाचा :

Pravin Darekar | भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल ! ‘शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्या’

Pune News | हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही ! सध्याच्या बिकट परिस्थितीत गांधीविचार ठेवेल देशाला एकसंध

Devendra Fadnavis | ‘या’ तारखेपासून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

Related Posts