IMPIMP

Gold Rate Today : 8 महिन्यात 12 हजार रुपयांनी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे Latest दर

by bali123
gold silver rates today increased today 10 gram gold today rs 47415

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – करोना प्रतिबंधक सुरु झालेली लसीकरण मोहीम, अर्थसंकल्पावेळी सोन्यावरील आयात शुल्कात केलेली कपात आणि भांडवली बाजारातील तेजी यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या gold  दरात गेल्या काही दिवसापासून वारंवार घट होताना दिसत आहे. तर आतापर्यंत सोन्याचा दर १२ हजारांनी स्वस्त झाला आहे. सोने gold  खरेदी करण्यासाठी ग्राहकाला एक चांगली संधी आहे. सध्या बाजारात सोन्याचा भाव ४४ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

दरम्यान, २०२० च्या ऑगस्टमध्ये सोने प्रती १० ग्रॅम ५६३०० रुपये इतके दर होते. तर आज सोमवारी धुलिवंदन निमित्त MCE मल्टी कमॉडिटी (Multi Commodity Market) बाजार बंद आहे. या बाजारात शुक्रवारी अकहरच्या सत्रात सोने gold आणि चांदीमध्ये अल्प सुधारणा झाली. MCX वर बाजार बंद होताना सोन्याचा दर ४४६५० रुपयांवर थांबला. त्यामध्ये ४५ रुपयांनी घट झाली. याआधी दिवसभरात सोन्याचा दर ४४४४१ रुपये इतका स्वस्त झाला होता. तर चांदीचा दर १ किलोसाठी ६४६८४ रुपयांवर स्थिरावला. यामध्ये १८५ रुपयांनी घट झाली होती.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

तर चालू महिन्यात सोने gold  १८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट महिन्यातील विक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या १२ हजार रुपयांनी स्वस्त आहे. २०२० रोजी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोन्याचा भाव २८ टक्क्यांनी वधारला होता. तर चांदीच्या किमतीत १० हजारांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७२६.४५ डॉलर आहे. चांदीचा भाव २५.२३ डॉलर प्रती औंस आहे. तसेच आजचे नवे दर जाणून घ्या.

मुंबई –
२२ कॅरेट – ४२९८० रुपये
२४ कॅरेट – ४३९८० रुपये

दिल्ली –
२२ कॅरेट – ४४०७० रुपये
२४ कॅरेट – ४८०७० रुपये

चेन्नई –
२२ कॅरेट – ४२२४० रुपये
२४ कॅरेट – ४६०८० रुपये

कोलकत्ता –
२२ कॅरेट – ४४२०० रुपये
२४ कॅरेट – ४६९२० रुपये

Also Read

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

Related Posts