IMPIMP

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

by pranjalishirish
Sharad Pawar Reaction About MLAs Houses | sharad pawars first reaction about mlas houses he clearly said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये झालेल्या गुप्त बैठकीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

पोटात दुखू लागल्याने आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली आहे. पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे बुधवारी (31 मार्च) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेकांनी शरद पवार यांना फोनवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

गृहखात्यानंतर आता महसूल खाते भाजपच्या ‘रडार’वर, विखे-पाटलांनी केलं थोरातांच्या खात्याबाबत सूचक वक्तव्य

राज्यातील मान्यवरांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केली त्याबद्दल शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना असल्याचे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांनी विचारपूस केल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे देखील ट्विटरवरुन आभार मानले आहेत.

Video : शरद पवार अन् अमित शहांच्या भेटीच्या चर्चेनंतर भाजपाच्या आमदारानं शेअर केला तो व्हिडीओ, अन्…

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील दोन आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहेत. या कालावधीमधील त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिला.

Also Read

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts