IMPIMP

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’

by bali123
shivsena mp sanjay raut taunts opposition leaders

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज धुलिवंदनाच्या निमित्तानं भाजपला खोचक संदेश दिला आहे. महाराष्ट्राला खूप काम आहे. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवण्याचं काम करू नका आणि उठसुट आरोपांचे रंग उधळू नका असं राऊत म्हणाले आहेत.

सचिन वाझेंचे सर्व मालक अस्वस्थ आणि चिंतीत आहेत असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. याबाबत विचारलं असता राऊतांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आणि फडणवीसांवरही टीका केली.

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

‘विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्रात काही दिसत नाही. त्यांना फक्त दिल्ली दिसते’
संजय राऊत Sanjay Raut  म्हणाले, विरोधी पक्षनेते अशाच प्रकारे आरोप, टीका-टिप्पणी करत असतात. परंतु आपल्या विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्रात काही दिसत नाही. त्यांना फक्त दिल्ली दिसते. गृहमंत्री, गृहसचिव आणि पंतप्रधान दिसतात. परंतु महाराष्ट्रातलं सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे. भलेही ते तीन पक्षांचं असेल. त्यामुळं इथं काय निर्णय घ्यायचा ? काय भूमिका घ्यायची हे इथल्या सरकारला चांगलं माहित आहे असंही राऊतांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवू नका’
होळीच्या निमित्तानं विरोधकांना काय संदेश द्याल असं विचारल्यानंतर संजय राऊत Sanjay Raut  म्हणाले, विरोधक हे बेरंग आहेत. त्यांना कोणताच रंग नाही. त्यांना रंग असता तर त्यांनी चांगले रंग उधळले असते. त्यांनी आमच्यासोबत प्रेमाची होळी खेळावी एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे. महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवू नका. त्यातून काहीही साध्य होणार नाही. सरकार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Also Read

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

 

त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

 

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

 

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Related Posts