IMPIMP

Gujarat election Results | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची प्रतिक्रया; म्हणाले, ‘पराभूत झाले आहेत, त्यांनी…’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujarat election Results) लागला आहे. भाजपने गुजरातमध्ये सातवा विजय मिळवला आहे. २७ वर्षे सलग भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे. एकूण १८२ जागांपैकी १५६ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निकालानंतर (Gujarat election Results) आता राजकीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या या विजयावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. अजित पवार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

पवार म्हणाले, “एक्झिट पोलनुसार गुजरातचा निकाल पाहायला मिळाला आहे. मात्र, स्पष्ट निकाल अद्यापही हाती आलेले नाहीत. गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस हे दोघे वेगवेगळे लढले. त्यांच्या मतांची टक्केवारी स्पष्ट झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल. ज्यावेळी आप गुजरातमध्ये निवडणूक लढणार, हे निश्चित झाले होते, त्यावेळी आपमुळे काँग्रेसला फटका बसणार, असं मत राजकीय विश्लेषकांचं होतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, त्याप्रकारे निकाल आले आहेत.” (Gujarat election Results)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पवार म्हणाले, “याचबरोबर काल दिल्लीत आपने भाजपाचा पराभव केला आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. हा संमिश्र प्रकारे निकाल लागला आहे. मात्र, तुम्ही पोटनिवडणुकीचा विचार केला, तर तिथे आताच्या सत्ताधारी पक्षाला यश मिळालेलं नाही.”

 

हार्दिक पटेलच्या वाटचालीवरही अजित पवारांनी त्यांचे मत व्यक्त केले, “हार्दिक पटेल पराभूत होईल, अशी सुरुवातीला परिस्थिती होती.
हार्दिकने पाच वर्षांपूर्वी स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं.
मात्र, त्याने पक्ष बदलल्यानंतर त्याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला आहे, असं वाटत नाही.
याबाबत विश्लेषण निवडणूक आयोगाकडून आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर करता येईल”
पुढे त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, “लोकशाहीत यश-अपयश येत असतं, जे निवडून आले आहेत,
त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि जे पराभूत झाले आहेत, त्यांनी खचून जाऊ नये, एवढाच सल्ला देतो.”

 

Web Title :- Gujarat election Results | ajit pawar reaction on gujarat assembly election result

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; न्यूट्रीलिशियस, इऑन वारियर्स संघांची विजयी आगेकूच!

Pune Crime | जास्त परताव्याचे आमिष दाखवून कॉलेजमधील मित्रानेच घातला 10 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…

 

Related Posts