IMPIMP

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

by nagesh
Harshvardhan Patil | Maha Vikas aghadi government takes stand against farmers power supply agricultural pumps disrupted Harshvardhan Patil

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन शेतकरी अद्याप कोरोना आणि मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या (Heavy rain) पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे त्यांना आधार देणे सरकारचे (Thackeray Government) कर्तव्य असताना, उटलपणे शेतीपंपांचा (agricultural pump) वीज पुरवठा (Power supply) खंडित करुन त्रास दिला जात आहे. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार असल्याचा आरोप भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केला आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करुन शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववतपणे चालू करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

वीज बिल (Electricity bill) माफ करावे अशी मागणी करणारेच सध्या सत्तेवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीचा विचार करुन वीज तोडणी मोहिम तात्काळ थांबवावी, अशी मागणी देखली हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली आहे.

 

महावितरणने (MSEDCL) शेतीपंपाचा वीज पुरवठा वीज थकबाकी वसुलीसाठी खंडित केला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रब्बी पिकांची पेरणी, ऊस पिकाच्या लागवडी चालू आहेत. सध्या महावितरणकडून जनावरांना व माणसांना पिण्याच्या पिण्यासाठी दररोज वीज पुरवठा तासभर देखील चालू ठेवला जात नाही. त्यामुळे जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

हर्षवर्धन पाटील यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन शेतीपंपांचा वीज पुरवठा चालु करण्यात यावा,
अशी मागणी केली. या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली.
सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
त्यामुळे वीज तोडणी मोहिम तात्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

Web Title :- Harshvardhan Patil | Maha Vikas aghadi government takes stand against farmers power supply agricultural pumps disrupted Harshvardhan Patil

 

हे देखील वाचा :

Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)

Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Midnight Toilet Habit | अर्ध्यारात्री वारंवार ‘टॉयलेट’ला जावे लागते का? ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

 

Related Posts