IMPIMP

Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका

by nagesh
Hypersomnia Symptoms | hypersomnia symptoms causes treatment get rid of these diseases

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Hypersomnia Symptoms | अनेकदा तुम्हाला जाणवले असेल की रात्रभर झोपूनही कामाच्या ठिकाणी झोप येते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे काही कारण आहे किंवा ही एक सामान्य समस्या आहे का? हा एक आजार असून त्याचे नाव हायपरसोमनिया (Hypersomnia Symptoms) आहे. यामुळे त्रस्त लोकांना पुन्हा पुन्हा झोप येते. अशावेळी ते चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यापेक्षा काही सवयी बदलायला हव्यात. ज्यामुळे ही समस्या संपुष्टात येऊ शकते. जसे तुम्ही झोपण्याची सवय बदलली पाहिजे. याशिवाय सकस आहाराचे सेवन करावे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वारंवार झोप येण्याचे कारण काय?
वारंवार झोप येण्याच्या समस्येला हायपरसोमनिया (Hypersomnia) म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्यांना रात्री झोपल्यानंतरही दिवसा झोप येते. त्यामुळे त्यांची कामेही होत नाहीत. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे जास्त दारू पिणे किंवा टेन्शन घेणे. झोप टाळण्यासाठी लोक चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यामुळे आणखी समस्या वाढतात. यासाठी कोणते उपाय करावे जाणून घेवूया.

 

१. झोपण्याच्या सवयीमध्ये बदल करा
जर निरोगी राहायचे असेल तर दररोज ७ ते ८ तास झोपा. याशिवाय झोपेचा पॅटर्नही एकसारखा ठेवा. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या वस्तू दूर ठेवा.

 

२. हेल्दी फूड खा
रोज हेल्दी फूड खाल्ले तर एनर्जी लेव्हल चांगली राहील. यामुळे प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात मिळेल. याशिवाय रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खाऊ नका, ज्यामुळे झोप येण्यास त्रास होतो. (Hypersomnia Symptoms)

 

३. पुरेसे पाणी प्या
हिवाळ्यात पुरेसे पाणी प्यायले जात नाही. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. यामुळे एनर्जी लेव्हल कमी होते आणि थकवा जाणवतो. शरीरात सुस्ती राहते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

४. दररोज व्यायाम करा
व्यायामाने रक्ताभिसरण चांगले होते. तसेच शरीर फिट राहते आणि तणावही दूर होतो. सकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hypersomnia Symptoms | hypersomnia symptoms causes treatment get rid of these diseases

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, जितेंद्र आव्हाडांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Amla Benefits | आवळ्याच्या पाण्याने कमी होतो लठ्ठपणा, डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते

Asia Cup 2023 | आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश; जय शाह यांची घोषणा

 

Related Posts