IMPIMP

J. P. Nadda | चंद्रपूरातील सभेत भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

by nagesh
J. P. Nadda | uddhav thackeray stabbed the bjp in the back for the post of chief minister

चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – चंद्रपूर येथे आज (दि. २ जानेवारी) रोजी आयोजीत सभेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (J. P. Nadda) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाना साधला. शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात त्यांनी (J. P. Nadda) उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जे.पी.नड्डा (J. P. Nadda) हे चंद्रपूर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या सभेला संबोधीत करत होते. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यश मिळावे यासाठी नड्डा यांनी ‘विजय संकल्प’ सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. यावेळी मंचावर वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, आमदार संजय रेड्डी, आमदार डॉ. रामदास आंबटकर व आमदार बंटी भंगाडिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

 

या सभेत बोलताना नड्डा(J. P. Nadda) म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली गेली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर माथा टेकता टेकता ठाकरे यांचा माथाच झुकला आहे. भाजपने जनाधार, जनधन, आधार व मोबाईल असा एकत्रित जॅम केला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मात्र ज्वाईन्टली एक्वायर मनी अशा पध्दतीने केवळ पैसा ओरबाडण्याचे काम केले. याच भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत आहेत.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

काँग्रेसच्या काळात अनेक आजारांनी तोंड वर काढले होते. पण यावर लस येण्यात अनेक वर्षे काँग्रेसची गेली.
मात्र कोरोना संकटात पंतप्रधान मोदी यांनी अवघ्या नऊ महिन्यात भारतात दोन लशींची निर्मिती केली.
त्याचप्रमाणे कधीकाळी भारतात मोबाईल आयात करावे लागत होते. आज ९७ टक्के लसींची निर्मिती भारतात होते.
प्रधानमंत्र्यांच्या पाच किलो गहू, तांदूळ, दाळ या मोफत धान्य योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे.
परिणामी, भारतात अतिगरीबी एक टक्क्यापेक्षा अधिकने कमी झाली आहे.
याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,
माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचीही भाषणे झाली. संचालन ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तर
आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मानले.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी रशियाशी बोलून यूक्रेन युध्द देखील थांबवले असे जे.पी.नड्डा(J. P. Nadda) यावेळी बोलताना म्हणाले.

 

Web Title :- J. P. Nadda | uddhav thackeray stabbed the bjp in the back for the post of chief minister

 

हे देखील वाचा :

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Sheezhan Khan | ‘मी निर्दोष आहे आणि…’; तुनिषा शर्मा प्रकरणावर आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया

 

Related Posts