IMPIMP

Jayant Patil | निलंबणाच्या कारवाईनंतर जयंत पाटील आक्रमक; ट्वीट करत व्यक्त केला संताप…

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Jayant Patil | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे चांगलेच वादळी होत आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आजचा (गुरूवारचा) दिवस हा दिशा सालियान मृत्यु प्रकरण तसेच आदित्य ठाकरेंवर रिया चक्रवर्तीला ४४ वेळा फोन केल्याच्या आरोपाने चांगलाच गाजला. तसेच आजचा दिवस आणखी एका कारणाने गाजला आणि तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या निलंबणामुळे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द काढल्याच्या कारणावरून जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या कारवाई नंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून या सर्व प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की, ‘या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय….!’

 

 

या सर्व प्रकरणात नेमके घडले असे की, दिशा सालियान प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. याचदरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली होती. पण विरोधी पक्षाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

 

यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती केली.
दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू देण्याची देखील मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशीच मागणी करायला सुरुवात केली.
आमची हरकत आहे. “१४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केलं.
आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय”, असं भास्कर जाधव म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना
उद्देशून म्हणाले की, “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका” त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा
करायला सुरुवात केली. आणि “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली.
त्यावर विधानसभा अध्यक्षांनी देखील जयंत पाटील हे तुमच्याकडून अपेक्षित नाही असे म्हणत नाराजी व्यक्त
केली आणि विधिमंडळाचे कामकाज तहकूब केले.
घडल्या प्रकाराबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची एक बैठक
झाली आणि या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा ठपका ठेवत
अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

Web Title :- Jayant Patil | maharashtra assembly session ncp jayant patil tweet after suspension during winter session

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 47 लाखाचा गंडा, पुण्यातील प्रकार

Shambhuraj Desai | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई यांची माहिती

Pune Crime | धक्कादायक! महिलेला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, पुण्यातील खराडी परिसरातील घटना

 

Related Posts