IMPIMP

Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | विश्व हिंदू परिषदेचे नेते मुकेश सोनी यांची भररस्त्यात गोळया झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
 Jharkhand ranchi murder vishwa hindu parishad leader mukesh soni sanjay seth furious hemant soren government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये (Ranchi) विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून (Firing in Ranchi) हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाचे (Bajrang Dal) खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी (Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni) असं या नेत्याचं नाव आहे. बुधवारी खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ मुकेश सोनी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

खलारी येथील मुकेश सोनी (VHP Leader Mukesh Soni) हे महावीर नगरमध्ये राहत होते. त्यांचे मॅक्लुस्कीगंज येथील धुर्वा मोरजवळ प्रधान ज्वेलर्स नावाचं दागिन्यांचं दुकान आहे. बुधवारी ते आपले दुकान बंद करून घरी परत जात होते. याच दरम्यान, बकुळीया तांडजवळ त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुकेश सोनी यांना डाक्रा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसापासून मुकेश फायर ब्रँड हिंदू नेता म्हणून आपली छाप पाडत होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी संशयितांकडे सुरुवात केली आहे.

 

 

भाजपा (BJP) आणि संघ विचार परिवाराच्या कार्यकर्त्यांना केलं जातं टार्गेट

विश्व हिंदू परिषद खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी स्थानिक आमदार समरीलाल आणि खासदार संजय सेठ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आमदार समरीलाल यांनी या घटनेच्या निषेधार्थ विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाणार नसून खलारी येथे जाणार असल्याचं सांगितलं आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

खासदार संजय सेठ म्हणाले की, भाजपा आणि संघ विचार परिवाराच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात आहे.
झारखंडला केरळ आणि पश्चिम बंगाल बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे.
एका व्यावसायिकाची आणि सामान्य नागरिकाची हत्या केली जाते ही अत्यंत दु:खद घटना आहे. येथील गुन्हेगारी वाढत असल्याचे हे उदाहरण आहे.

 

Web Title :- Jharkhand ranchi murder vishwa hindu parishad leader mukesh soni sanjay seth furious hemant soren government

 

हे देखील वाचा :

Shanaya Kapoor | महिप कपूर नंतर मुलगी शनाया कपूरला देखील कोरोनाची लागण; स्वत:हा झाली आयसोलेट

Army Chief Gen Naravane | मराठमोळे लष्कर प्रमुख मनोज नरवणे होणार नवे CDS?

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फुरसुंगीतील घटनेत 5 जणांना अटक

 

Related Posts