IMPIMP

Army Chief Gen Naravane | मराठमोळे लष्कर प्रमुख मनोज नरवणे होणार नवे CDS?

by nagesh
Army Chief Gen Naravane | army chief gen naravane takes charge as chairman of chiefs of staff committee

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Army Chief Gen Naravane | सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी चेअरमन ऑफ द चीफ ऑफ कमेटी स्टाफ (CDS) हे पद आहे. या पदाची जबाबदारी सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये जो अधिकारी वरिष्ठ आहे, त्याच्याकडे सोपवली जाते. ही जबाबदारी सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्याकडे होती. पण हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यामुळे या पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये सर्वाधिक वरिष्ठ असल्याने जनरल मनोज मुकुंद नरवणे (Army Chief Gen Naravane) यांनी चेअरमन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार जेव्हा सीडीएसची घोषणा करेल तेव्हा हे पद आपोआप नरवणे यांच्याकडे जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

डिसेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल बिपीन रावत यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यावेळी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर हे पद रिक्त आहे. परंपरेनुसार या पदावर तिन्ही सैन्यात ताळमेळ राखण्यासाठी नियुक्ती केली जाते. लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेच सध्या वरिष्ठ आहेत. सैन्यातील इतर दोन्ही दलांचे प्रमुख हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Chief Marshal V R Choudhary) आणि नौदल प्रमुख आर. हरीकुमार (Navy Chief R Harikumar) हे नरवणेंपक्षा ज्युनिअर आहेत. त्यामुळेच नरवणे यांच्याकडे चेअरमन ऑफ द चीफ ऑफ कमेटी स्टाफची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात केंद्र सरकार ज्यावेळी सीडीएसची घोषणा करेल त्यावेळी आपोआपच ही जबाबदारीही नरवणे यांच्याकडे देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

 

Web Title :- Army Chief Gen Naravane | army chief gen naravane takes charge as chairman of chiefs of staff committee

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फुरसुंगीतील घटनेत 5 जणांना अटक

Pune Crime | ‘सेल्फी’ दाखवून बदनामी करण्याची धमकी ! 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’

 

Related Posts