IMPIMP

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीच्या पोलिस कोठडीत वाढ

by nagesh
Kiran Gosavi | kiran gosavi has been sent to police custody till november 8 by Shivajinagar court of pune

पुणे : वृत्तसंस्थाक्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drugs Case) एनसीबीचा (NCB) प्रमुख पंच आणि पुण्यातील (Pune) फसवणुकीच्या (fraud) गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला (Kiran Gosavi) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची (police custody) मुदत संपल्याने त्याला आज शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 8 नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे किरण गोसावीची (Kiran Gosavi) दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

पुण्यातील फसवणुकीच्या प्रकरणात (Pune fraud case) अटक करण्यात आलेल्या किरण गोसावीची (Kiran Gosavi) 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली.
त्यामुळे त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा (Cyber crime) देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची (Forensic report) गरज असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे न्यायालयाने त्याची अजून तीन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तसेच आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या चार गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावी याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली केली होती.
न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करुन किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे.

 

Web Title : Kiran Gosavi | kiran gosavi has been sent to police custody till november 8 by Shivajinagar court of pune

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | ‘संजय राऊत रात्री करायचं ते दिवसा करतात’ – नारायण राणे (व्हिडिओ)

Narayan Rane | ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’ – नारायण राणे (व्हिडिओ)

Earn Money | नोकरीसह 1 लाख रुपयात सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल 40000 पेक्षा जास्त कमाई, सरकार करेल 80% मदत

 

Related Posts