IMPIMP

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

by nagesh
Kishori Pednekar | our diwali pahat is held every year this is the first time kishori pednekars target to bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईच्या माजी महापौर (Mumbai Former Mayor) आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दिवे आणि फटाके लावताना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी पेडणेकर यांनी ठाकरे-फडणवीस-शिंदे यांच्या भेटीवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, मी नेहमीच म्हणते की घर फिरले की घराचे वासे फिरतात. इथे मात्र वासे अगोदर फिरले आहेत. आता घर फिरवत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, आपल्याकडे मार्चमध्ये धुळवड खेळली जाते. पण महाराष्ट्रात ती मे पासून सुरु झाली होती. आणि जूनमध्ये एकदम उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचे एवढे अधःपतन होईल असे वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे अधःपतन होईल, असा कोणी विचार केला नव्हता. पण ते झाले आहे. या राजकारणातून तरुण पिढीने राजकारणात येऊ नये, असा पायंडा घातला गेला आहे. सुशिक्षित वर्गाने राजकारणात येऊ नये असा पायंडा घातला गेला. त्याला आम्ही छेद देणार आहोत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे चांगल्या वागणुकीतून हा पायंडा मोडणार आहेत.

 

तसेच शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव (MNS Deepotsav) हा नवीन नाही. गेली 10 वर्षे ते तो साजरा करत आहेत. पण तिघे जण त्या व्यासपीठावर आहेत, हे नवीन आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात.
पण शिवसेनेत वासे पहिले फिरले आणि आता घर फिरवत आहेत. शिंदे-फडणवीसांना महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे.
त्यांच्या कुरघोड्यांचा लोकांना कंटाळा आला आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.
मी गिरीश महाजन यांच्यावर बोलणार नाही, असेही पेडणेकर म्हणाल्या.

 

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरुन ते ठाकरे गटावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
त्यावर पेडणेकर म्हणाल्या, ते बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यांनीच त्यांना ही शिकवण दिली आहे.
कोणीही कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. त्यामुळे त्यात काही गैर नाही.
मी देखील अमित शहांना शुभेच्छा देते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kishori Pednekar | When the house moves, the wheels of the house move, but in Shiv Sena, the wheels moved first and now…, Kishori Pednekar’s criticism of Thackeray-Shinde-Fadnavis

 

हे देखील वाचा :

Blood Sugar Level | मधुमेहाच्या रुग्णांसाठी एखाद्या रामबाणपेक्षा कमी नाही लवंग, हिवाळ्यात अशाप्रकारे करा सेवन

Ajit Pawar | ठाकरे-शिंदे-फडणवीस भेटीवर अजित पवार म्हणाले -‘त्यांनी एकत्र…’

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या

 

Related Posts