IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला पाहिजेत ‘ही’ खाती

by nagesh
CM Eknath Shinde | uddhav thackeray is aggressive after cm eknath shinde started making phone calls to register the members of balasahebanchi shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – एकनाथ शिंदे-भाजप युती (Eknath Shinde – BJP) सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ खातेवाटपात ग्रामीण भागाच्या विकासाशी (Rural Development) निगडित एकही खाते वाट्याला न आल्याने शिंदे गटातील (Shinde Group) बरेच मंत्री नाराज झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) ग्रामीण भागाशी निगडित एक-दोन खाती मिळावीत यासाठी आता शिंदे गटाकडून आग्रह धरला जात आहे. यावेळी भाजपकडे असलेल्या ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (Public Construction), जलसंपदा या खात्यांपैकी एक-दोन खाती शिंदे गटाला मिळावीत, अशी आग्रही मागणी शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी (CM Eknath Shinde) या मंत्र्यांनी चर्चासुद्धा केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ऑगस्ट महिन्यात झाला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये खातेवाटप करण्यात आले. यात भाजपच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय अशी महत्त्वाची खाती आली तर शिंदे गटाच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित कृषी तसेच रोजगार हमी व फलोत्पादन ही खाती आली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शिंदे गटातील मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

 

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब



शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लांबत असल्याने अस्वस्थ झाले आहेत.
पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मंत्र्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता.
मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी विस्तार होत नसल्याने नाराज आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
आता नवरात्रीनंतर (Navratri) मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | second cabinet expansion shinde group wants accounts related to rural areas

 

हे देखील वाचा :

Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे

Pune Crime | पत्नीचे प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहिल्याने पतीची आत्महत्या; पत्नीच्या प्रियकराने दिली होती जीवे मारण्याची धमकी

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

 

Related Posts