IMPIMP

Maharashtra DCP – SP Transfers | महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पिंपरी चिंचवडला मिळाले आणखी 2 DCP

by sachinsitapure
Maharashtra DCP - SP Transfers | Transfers of Superintendents of Police, Additional Superintendents of Police in Maharashtra Police Force; Pimpri Chinchwad got 2 more DCPs
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra DCP – SP Transfers |  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate) आणखी दोन पोलीस उपायुक्त (DCP) निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting)  देण्यात आली होती. त्यानुसार गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि.18) दोन पोलीस उपायुक्तांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली केली आहे. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे (Government of Maharashtra) अवर सचिव स्वप्निल गोपाल बोरसे (Swapnil Gopal Borse) यांनी काढले आहेत. (Maharashtra DCP – SP Transfers)
Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पदे निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार आता ही पदे भरण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने शासनाने दोन पोलीस उपआयुक्त पदे निर्माण करण्यास मान्यता दिली होती. (Maharashtra DCP – SP Transfers)

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

1. संदीप डोईफोडे DCP Sandeep Doifode (पोलीस अधीक्षक, फोर्स वन (U.C.T.C.) ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)

2. शिवाजी पंडितराव पवार DCP Shivaji Panditrao Pawar (अपर पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)

Related Posts