IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी, शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाला (Shinde Group) दिला आहे. शरद पवार  आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने शिवसेना आणि शिंदे गटाला एक सल्ला दिला. मुख्यमंत्री हे फक्त पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दसरा मेळावा जरुर घ्यावा. पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल, अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये, अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

शरद पवारांचा अशोक चव्हाणांना टोला

 

2014 साली शिवसेना युतीचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे (Congress) आली होती.
मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने परस्पर भाजपला (BJP) पाठिंबा दिल्याने त्यावेळी महाविकास आघाडी सरकार
(Maha Vikas Aghadi Government) स्थापन होऊ शकले नाही,
असा दावा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला होता.
यावर शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादीला कोणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला थोडीफार माहिती असती.
राष्ट्रवादीत अन्य नेत्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
पण त्यांनी किमान ही गोष्ट माझ्या कानावर घातली असती.
पण अशोक चव्हाणांनी असा काही प्रस्ताव दिल्याचे मी कधीच ऐकलं नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar advice to shivsena and eknath shinde camp for dasara melava 2022

 

हे देखील वाचा :

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

Shambhuraj Desai | गोव्यातून दारुची एक बाटली आणली तरी…, शिंदे सरकारचा आदेश, राज्यातील मद्यविक्रेत्यांना दिलासा, महसुलही वाढणार

Andheri East by Election | शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाची पहिली परीक्षा, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

IND vs SA 2nd T20 | गुवाहाटीत झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर झाली ‘या’ विक्रमाची नोंद

 

Related Posts