IMPIMP

Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवतोय; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

by nagesh
Maharashtra Political Crisis | central system along with the election commission is providing confidential information to the shinde group serious allegation by chandrakant khaire

औरंगाबाद :  सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महारष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या महत्वाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरुवात झाली आहे. न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे (Maharashtra Political Crisis) सर्वांचे लक्ष लागले असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठे विधान करत गंभीर आरोप केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना कोणाची याबाबत ज्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सुनावणी सुरु आहे, त्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर चंद्रकांत खैरे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला (Shinde Group) गोपनीय माहिती (Confidential Information) पुरवत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

काय म्हणाले खैरे?

न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले,
आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर काही लोक बातम्या पुरवत आहेत.
निवडणूक आयोगात जर आम्ही एखादा अर्ज केला तर त्याच्या पाच मिनिटापूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो.
त्यामुळे कुठेतरी लिकेज होत आहे. केंद्र शासनाच्या (Central Government) काही यंत्रणा अशा आहेत की,
आम्ही कोणता कागद दिला आणि त्यापेक्षा शिंदे गटाने कोणता कागद द्यावा यासंदर्भात माहिती पुरवली जाते,
असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यामुळे खैरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | central system along with the election commission is providing confidential information to the shinde group serious allegation by chandrakant khaire

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | अनलोडींगच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर खंडणीचा गुन्हा, महाळुंगे MIDC परिसरातील प्रकार

Dream Girl 2 Teaser | बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल 2’ चा टीझर रिलीज

Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, केटरिंगचे काम करण्याऱ्या पाच महिलांचा मृत्यू; 13 गंभीर जखमी

 

Related Posts