IMPIMP

Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल

by sachinsitapure
Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | केंद्रातील मोदी सरकारची (Modi Government) सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विरोधकांनी तयार केलेल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले असून या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. (Maharashtra Political News) तर तिसरी बैठक ( INDIA Alliance Meeting) मुंबईत होत आहे. आज आणि उद्या ही बैठक होत असून या बैठकीसाठी देशभरातील अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत. इंडिया बैठकीवरुन भाजपने (BJP) ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ट्विट करत विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे, असे म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. ज्या काँग्रेसने (Congress) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे, अशा शब्दात शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Political News)

महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत.
पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना,
महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!,
असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर घणाघात केला आहे.

देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू–कश्मीर (Jammu and Kashmir), महाराष्ट्रात लोकशाही नाही.
न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे.
देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत.
असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) व्यक्त करण्यात आला आहे.

Related Posts