IMPIMP

Mahavikas Aghadi Government | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता? एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार सुरतमध्ये; दुपारी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

by nagesh
Deepak Kesarkar | it is illegal to remove eknath shinde from the post of shiv sena leader say deepak kesarkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mahavikas Aghadi Government | विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) केवळ 150 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार सुरतमध्ये गेल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे पराभव झाल्याने काँग्रेसमध्ये (Congress) संतापाची लाट आली असून सरकारमध्ये राहायचे का? अशी विचारणा होऊ लागली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेसोबत 13 पेक्षा अधिक आमदार सोबत असल्याची माहिती देखील सूत्राकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे दुपारच्या दरम्यान आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाविकास आघाडीला 171 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विधान सभेमध्ये ते कधीही समोर आले नव्हते. राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वप्रथम सरकारची परीक्षा झाली. त्यात शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. या पराभवापेक्षा या सरकारला केवळ 150 आमदारांनी पाठिंबा दिल्याचे या मतदानात आढळून आले. त्याचा मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. बहुमतासाठी 145 मते आवश्यक असतात. त्यामुळे हे सरकार काठावर असल्याचे दिसून आले. (Mahavikas Aghadi Government)

 

विधान परिषदेची मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच दुसरीकडे एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसह सोमवारी रात्री सात वाजताच खासगी विमानाने सुरत येथे गेले आहेत. त्यांच्याबरोबर प्रताप सरनाईक (Pratap Saranaik), संजय राठोड (Sanjay Rathore), अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्यासह 12 आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. ते दुपारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी शिंदे यांची नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे. जर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा व भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे पुढील काही तासातील राजकीय हालचाली अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत.

 

Web Title :- Mahavikas Aghadi Government | Mahavikas Aghadi government likely to be in the minority? 13 MLAs including Eknath Shinde in Surat; Possibility to clarify role in the afternoon

 

हे देखील वाचा :

Politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ! विधानपरिषदेच्या निकालानंतर आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद वाढला; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

Sangli Crime News | खळबळजनक ! सांगली जिल्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts