IMPIMP

Mask Compulsion in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती; जाणून घ्या कोणकोणत्या ठिकाणी मास्क बंधनकारक

by nagesh
Mask Compulsion in Maharashtra | mask compulsion in public places of maharashtra coronavirus news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mask Compulsion in Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Corona) रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची (Covid Task Force) बैठक घेण्यात आली. त्यानंतर आता मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक (Mask Compulsion in Maharashtra) करण्यात आलं आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना (District Officer) पत्र पाठवलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता राज्याला चिंता लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य विभागाकडून (State Health Department) काल (शुक्रवारी) जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने (Maharashtra State Government) नव्याने निर्बंध लावणार असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश करण्यात आला आहे. (Mask Compulsion in Maharashtra)

 

पत्रात काय म्हटलं आहे –
अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचं प्रमाण तात्काळ वाढवावं. असं म्हटलं आहे.

 

या ठिकाणी मास्क बंधनकारक –

रेल्वे
बस
सिनेमागृह
सभागृह
कार्यालये
रुग्णालये
महाविद्यालये
शाळा
अन्य सार्वजनिक ठिकाणी

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Mask Compulsion in Maharashtra | mask compulsion in public places of maharashtra coronavirus news

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On BJP | ‘झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा डाव काहीजण करताहेत’; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर, 1 जुलैपासून वाढू शकतो 5% DA

Pravin Darekar In Pune | ‘महागाई, बेरोजगारी वाढली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतू भारतीय जनता PM नरेंद्र मोदी यांच्यावर खूश’ – प्रविण दरेकर

 

Related Posts