IMPIMP

MLA Nitin Deshmukh Escaped | 20-25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या ‘या’ आमदाराने सांगितला धक्कादायक प्रकार !

by nagesh
MLA Nitin Deshmukh Escaped | akola balapur shivsena mla nitin deshmukh escaped from clutches of eknath shinde surat gujrat Maharashtra Political Crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Nitin Deshmukh Escaped | शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) भूकंप घडवून आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्याबाजूने 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. मात्र, यापैकी काही आमदारांना फसवून गुजरातला नेण्यात आल्याचे समोर येत आहे. कालच शिंदे यांच्या तावडीतून सुटून आलेले उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सुटकेचा थरारक प्रसंग सांगितला. (MLA Nitin Deshmukh Escaped)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh Escaped) यांनी तर धक्कादायक प्रकार सांगितला आहे. देशमुख यांना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याचा बनाव रचण्यात आला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेऊन 20-25 जणांनी त्यांना पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गोटातून सुटका करून घेतलेले आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “माझा रक्तदाब वाढला नव्हता. मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20-25 जणांनी पकडून बळजबरीने इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन कसले होते हे माहित नाही.”

 

 

 

देशमुख पुढे म्हणाले की, “माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री 12 वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी 200 पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्ट अटॅक असल्याचा बनाव रचला. देशमुख म्हणाले, अटॅकचे कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले आहे.

 

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कालच गंभीर आरोप केले होते की,
मंगळवारी दुपारी नितीन देशमुखांना सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
मुंबईतून त्यांचे अपहरण केले गेले.
सोमवारी रात्री त्यांनी स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) आणि गुंडांनी बेदम मारहाण केली.
मुंबईतील गुंड देखील तेथे आहेत गुजरातच्या भूमीवर हिंसा कशी ?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- MLA Nitin Deshmukh Escaped | akola balapur shivsena mla nitin deshmukh escaped from clutches of eknath shinde surat gujrat Maharashtra Political Crisis

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या आमदारांच्या नाराजीचे कारण आलं समोर, राष्ट्रवादी व काँग्रेसवर केले आरोप

Health Tips | वयाच्या 60 व्या वर्षानंतरही योगाभ्यास करता येतो का? जाणून घ्या कोणती आसनं फायदेशीर

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

Related Posts