IMPIMP

Monsoon Weather Update | ‘मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाही’ ! IMD च्या माहितीवर स्कायमेटने केला दावा

by nagesh
Monsoon Weather Update | skymet and india meteorological department (IMD) on monsoon kerla entry

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Monsoon Weather Update | मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून Indian Meteorological Department (IMD) 29 मे रोजी देण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर मान्सूनचं केरळात (Monsoon Weather Update) आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, स्कायमेट (Skymet) या संस्थाने हवामान विभागाच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाही, असा दावा स्कायमेटकडून करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्कायमेटच्या माहितीनुसार, एका दिवसाच्या निरीक्षणाच्या माध्यमातून अंदाज व्यक्त करणे हे निकषांचे उल्लंघन आहे, असा दावा स्कायमेटकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर यापूर्वी असं कधी घडलं नाही असं देखील स्कायमेटने सांगितलं आहे. या विषयावरुन भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्कायमेट (Skymet) यांच्यात सवाल – जबाब उपस्थित होताना दिसत आहे. (Monsoon Weather Update)

 

‘जर केरळात मान्सूनचे आगमन झाले असेल तर तिथे किमान दोन दिवस सारखा पाऊस पडला पाहिजे.
या दोन दिवसामध्ये 60 टक्क्याहून आणि 2.2 मीमी पेक्षा जादा पाऊस पडला तर आपण केरळात मान्सून दाखल झाल्याचा दावा करू शकतो,’ असं स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.
या दरम्यान स्कायमेटचा हा दावा भारतीय हवामान विभागाकडून फेटाळण्यात आला आहे.
मात्र, केरळमध्ये मान्सून दाखल न झाल्याच्या आपल्या दाव्यावर स्कायमेट ठाम आहे. अशामुळे या दोघांमध्ये मतभेद दिसून येत आहे.

 

दरम्यान, मान्सूनच्या आगमनाच्या तीन निकषांपैकी 2 निकष पूर्ण होत नसल्याचा दावा स्कायमेटकडून करण्यात आला आहे.
परंतु, हवामान विभागाने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला असला तरी आता हवामान विभागाच्या (IMD) कारभारावर सवाल उपस्थित केले जातेय.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Monsoon Weather Update | skymet and india meteorological department (IMD) on monsoon kerla entry

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! अंडाबुर्जीवाल्याच्या मारहाणीत 2 कचरावेचकांचा मृत्यू

Chia Seeds Benefits | पचन आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; जाणून घ्या

Vodafone Idea मध्ये Amazon करू शकते मोठी गुंतवणूक, शेअरमध्ये जोरदार तेजी

 

Related Posts