IMPIMP

MS Dhoni | धोनीचा अजून एक विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला CSK चा पहिला फलंदाज

by nagesh
MS Dhoni | ms dhoni completes 200 sixes for chennai super kings see records

सरकारसत्ता ऑनलाईन – MS Dhoni | कालपासून म्हणजेच 31 मार्च पासून आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या सीझनमधील पहिला सामना काल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चेन्नई सुपरकिंग्जचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आय़पीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून 200 षटकार मारण्याची कामगिरी धोनीने केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे विक्रम?
कालच्या सामन्यात धोनीने गुजरातविरुद्ध 7 चेंडुत नाबाद 14 धावा केल्या. यामध्ये धोनीने 1 षटकार आणि 1 चौकार मारला. याचबरोबर धोनीने (MS Dhoni) आय़पीएलमध्ये एका संघाकडून खेळताना 200 पेक्षा जास्त षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 230 षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी पहिल्या नंबरवर आहे. त्याने आतापर्यंत 20व्या षटकात 53 षटकार मारले आहेत.

 

आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून खेळताना 200 किंवा त्यापेक्षा षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या (Chris Gayle)
नावावर आहे. त्याच्यानंतर एबी डिविलियर्स (AB de Villiers), कायरन पोलार्ड (Kieran Pollard), विराट कोहली (Virat Kohli)
आणि महेंद्रसिंग धोनी यांचा नंबर लागतो. ख्रिस गेलने आरसीबीकडून (RCB) खेळताना 239 तर डिविलियर्सने 238 षटकार मारले आहेत.
पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना 223 तर विराटने आरसीबीकडून 218 षटकार मारले आहेत.
तर धोनीने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना 200 षटकार मारले आहेत.

 

 

Web Title :- MS Dhoni | ms dhoni completes 200 sixes for chennai super kings see records

 

हे देखील वाचा :

Sai Resort Case | साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना अटक

MP Supriya Sule | अजित पवारांनंतर सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांना सुनावलं, म्हणाल्या – ‘इतक असंवेदनशील…’ (व्हिडिओ)

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न

 

Related Posts