IMPIMP

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

by nagesh
 Nandurbar Police | Nandurbar police once again stopped child marriage! Anti-child marriage resolution in 602 Gram Panchayats of the district from March 8 till date, SP PR. Patil's initiative

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) ‘अक्षता समिती’ने गुरुवारी (दि.30) जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे होत असलेला बालविवाह (Child Marriage) रोखला होता. यानंतर शुक्रवारी (दि.31) नंदुरबार तालुक्यातील बाल अमराईत होणारा बालविवाह नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) रोखला. पोलिसांनी सलग दोन दिवसांत दोन बालविवाह रोखले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरुवारी अक्कलकुवा येथे बालविवाह रोखणाऱ्या पथकाचा अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या हस्ते सत्कराचा छोटेखानी कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी पोलीस अधीक्षकांना चाईल्ड लाईन, नंदुरबार (Child Line, Nandurbar) या संस्थेकडून माहिती मिळाली की, नंदुरबार तालुक्यातील बाल अमराई येथे एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत आज (शुक्रवार) बालविवाह होणार आहे. (Nandurbar Police)

 

घटनेचे गांभीर्य ओळखून पी.आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अक्षता सेलला (Akshata Samiti) बालविवाह थांबवून वधू-वरांच्या पालकांचे समुपदेशन (Counselling) करण्याचे आदेश दिले. अक्षता सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे (API Naina Deore) व त्यांच्या पथकाने तातडीने बाल अमराई येथे धाव घेतली.

 

पथकाने पोलीस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीच्या सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता एका ठिकाणी साखरपुडा कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली. अक्षता सेलच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन मुलगा व मुलीच्या नातेवाईकांकडे त्यांच्या जन्म तारखेबाबत चौकशी करुन आधार कार्डची मागणी केली. आधार कार्डची पाहणी केली असता मुलीचे वय 17 वर्षे तर मुलाचे वय 19 वर्षे 10 महिने असल्याचे निदर्शनास आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर अक्षता सेलच्या पथकाने मुलीचे आणि मुलाच्या पालकांचे तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नातेवाईकांचे समुपदेशन
करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून
(Nandurbar Taluka Police Station) कायदेशीर नोटीस दिली.
मुलीच्या व मुलाच्या पलकांनी मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्षे झाल्यानंतरच विवाह करण्याची हमी नंदुरबार पोलिसांना दिली.

 

याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेश अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. अक्षता सेलच्या माध्यमातून सलग दुसरा बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या बालविवाहाच्या मोठ्या समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल, असा विश्वास पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे
(Addl SP Nilesh Tambe), नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Officer Sachin Hire),
स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI Kiran Kumar Khedkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार (PI Rahul Pawar) अक्षता सेलचे प्रभारी
सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे (PSI Suresh Sonawane),
एसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी (LCB PSI Anil Gosavi), पोलीस अंमलदार दिपक गोरे, विनायक सोनवणे, विजय ढिवरे,
अभय राजपुत, अरुणा मावची, बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ, चाईल्ड लाईनच्या मेघा पाटील यांनी संयुक्तीकपणे केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar police prevented second consecutive child marriage in two days

 

हे देखील वाचा :

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न

MLA Eknath Khadse | ‘जे गोपीनाथ मुंडेंसोबत घडलं तेच पंकजा मुंडेंसोबत घडतंय’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार ! मनपाच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची ‘हद्दपार’, शासनाने जाहिर केली पुणे मनपाची सुधारित हद्द

 

Related Posts