IMPIMP

Mumbai Police – Pune Crime News | मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबई, पुणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी; पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ

by nagesh
Mumbai Police – Pune Crime News | threatening call to mumbai police pune bomb blast

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Police – Pune Crime News | मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोनने राज्याचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील (Pune News) अनेक भागांमध्ये बॉम्बस्फोट (Bomb Blast) करणार असल्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात उद्या (24 जून) सायंकाळी साडे सहा वाजता स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी या फोन कॉलवरुन (Threatening Call) पोलिसांना दिली आहे. (Mumbai Police – Pune Crime News)

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीनं धमकीचा फोन करणाऱ्याला अटक केली आहे. सुमारे 25 ते 30 वर्षांच्या आरोपीला मुंबईत आणले आहे. कॉल करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपीची वेगवेगळी नावं असून तो पोलिसांना त्याचं खरं नाव सांगत नाहीये. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, एका कॉलरने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) फोन केला. आणि शनिवारी (दि.24) संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला 2 लाख रुपयांची गरज आहे. ही रक्कम मला मिळाल्यास हा बॉम्बस्फोट मी रोखू शकतो. तसेच, पुण्यातही (Pune Police) बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. मला दोन लाख रुपये मिळाल्यास मी मलेशियाला जाणार असल्याचे त्याने सांगितले.

पोलीस तपासादरम्यान कॉलरनं हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून आल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीला पोलिसांकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी (Amboli Police Station)
यासंदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला असून ते
या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title : Mumbai Police – Pune Crime News | threatening call to mumbai police pune bomb blast

Related Posts