IMPIMP

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

by nagesh
MVA Mahamorcha | the police finally gave permission for shivsena ncp and congress maha march in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – MVA Mahamorcha | महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल वक्तव्य आणि राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्यावर महाविकास आघाडीकडून महामोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात येणार आहे. उद्या शनिवारी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला परवानगी (permission) मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या मोर्चाला पोलिसांनी (Mumbai Police) अटी शर्थींसह परवानगी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेला मोर्चा (MVA Mahamorcha) काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील त्याला पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. यावरुन राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती दिली. हा मोर्चा शांततेत व्हावा यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मला असे वाटते की, लोकशाही पद्धतीने (Democratically) कोणाला विरोध करायचा असेल तर ते तो करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) नीट राहिली पाहिजे एवढ्या पुरतं सरकारचा यामध्ये हस्तक्षेप असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

सरकारने परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी
प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी
बोलताना सांगितले होते की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे.
तेव्हा त्यांनी परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही.
या मोर्चा संबंधित लोकांत औत्सुक्य आणि राग आहे. शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MVA Mahamorcha | the police finally gave permission for shivsena ncp and congress maha march in mumbai

 

हे देखील वाचा :

Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे

Ashish Shelar | ‘मविआ’च्या मोर्चाला भाजप देणार ‘माफी मांगो’ आंदोलनाने उत्तर, आशिष शेलारांची माहिती (व्हिडिओ)

 

Related Posts