IMPIMP

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

by nagesh
Offline Digital Payments | rbi allows offline digital payments to penerate rural india

नवी दिल्लीवृत्त संस्थाOffline Digital Payments | ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये डिजिटल व्यवहारांना (Digital Transaction) चालना देण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्सबाबत (Offline Digital Payments) रूपरेषा जारी केली. सध्या, ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना परवानगी आहे. आता कमाल 10 व्यवहारांपर्यंत ऑफलाइन व्यवहार करण्याची मर्यादा असेल म्हणजेच एकूण 2,000 रुपये.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे असे व्यवहार, ज्यांना इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नसते. ऑफलाइन पद्धतीने, कार्ड, वॉलेट आणि मोबाइलसह कोणत्याही माध्यमातून समोरासमोर पेमेंट केले जाऊ शकते.

 

 

AFA आवश्यक नाही

आरबीआयने म्हटले आहे की, अशा व्यवहारांसाठी अ‍ॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA) आवश्यक नाही. आरबीआयने सांगितले की, यामध्ये पेमेंट ऑफलाईन होणार असल्याने, थोड्या अंतरानंतर ग्राहकांना SMS किंवा ई-मेलद्वारे अ‍ॅलर्ट मिळतील.

 

 

किती असेल ट्रांजक्शन लिमिट

प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 200 रुपये असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल. आरबीआयने सांगितले की, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे. (Offline Digital Payments)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय होतील याचे फायदा

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ऑफलाइन पेमेंटमुळे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. विशेषतः गावे आणि छोट्या शहरांमध्ये ही व्यवस्था तात्काळ लागू झाली आहे. ग्राहकांच्या परवानगीनंतरच ऑफलाइन पेमेंटचा वापर करता येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

 

 

Web Title :  Offline Digital Payments | rbi allows offline digital payments to penerate rural india

 

हे देखील वाचा :

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

PDCC Election Results | पीडीसीसी बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का ! सलग 22 वर्षे संचालक असलेले आत्माराम कलाटे, 15 वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के पराभूत; सुनिल चांदेरे, विकास दांगट विजयी

 

Related Posts