IMPIMP

PCMC | पीसीएमसीमधील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ

by nagesh
PCMC | transgenders were appointed on contractual basis as janitors assistants and staff pcmc news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) 27 तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची सुरक्षा विभागात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षा विभागात रखवालदाराचे मदतनीस आणि ग्रीन मार्शल पथकासाठी कर्मचारी म्हणून 27 तृतीयपंथीय काम करत आहेत. त्यांच्या कामाचा सहा महिन्यांचा करार संपत आल्याने त्यांना आता 2 महिन्यांची मुदतवाढ महापालिकेने (PCMC) दिली आहे. यासाठी होणाऱ्या खर्चास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुरक्षा विभागातील रखवालदाराचे मदतनीस आणि ग्रीन मार्शल पथकातील कर्मचारी म्हणून तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी 27 तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती. एमके फॉसिलिटीज सर्व्हिसेस – 8 कर्मचारी,
नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस – 8 कर्मचारी, सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस 7 कर्मचारी आणि
क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस 4 कर्मचारी अशी एकूण 27 तृतीयपंथीयांची नियुक्ती राजेश पाटील यांनी 1 जुलै 2022
ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी केली होती. त्यांना दरमहा 18 हजार 570 रुपये वेतन देण्यात येत होते. आता त्यांना दोन महिन्यांचा कालावधी वाढवून मिळाला असून, त्यांचा 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत कामाचा कार्यकाळ असणार आहे.

 

 

Web Title :- PCMC | transgenders were appointed on contractual basis as janitors assistants and staff pcmc news

 

हे देखील वाचा :

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा

SC On Demonetisation | सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायालयाला; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आरबीआयला फटकारले

IND vs BAN 2nd ODI | भारतीय संघाला मोठा धक्का; रोहित शर्माला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Pune Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक

 

Related Posts