IMPIMP

PM Cares For Children Scheme | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या लाभासाठी कोण आहे पात्र?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत (PM Cares
For Children Scheme) सहाय्य रकमेसह शिक्षण (Education) आणि वैद्यकीय विम्याची (Medical Insurance) सुविधा जाहीर केली होती. यानुसार कोरोनामुळे (Corona) आई – वडिलांचे (Parents) छत्र गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड (Monthly Stipend) दिला जाईल, असे सांगितले होते. याशिवाय वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्श फॉर चिल्ड्रन (PM Cares For Children Scheme) या योजनतील पात्र मुलांना पीएम केअर फंडातून (PM Care Fund) एकाच वेळी 10 लाख रुपये दिले जातील, या मुलांना केंद्र सरकार (Central Government) मोफत शिक्षण देईल, त्याच्या उच्च शिक्षणाचा (Higher Education) खर्चही त्यांना मिळेल आणि त्याचे व्याज पीएम केअर फंडातून दिले जाईल असे सांगण्यात आले होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नोंदणीची तारीख वाढवली
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने (Ministry of Women and Child Development) पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या (PM Cares For Children Scheme) नोंदणीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर 2021 होती. याबाबत मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (Principal Secretary), महिला आणि बाल विकास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागांना पत्र लिहिले आहे. त्याची एक प्रत सर्व जिल्हा दंडाधिकारी District Magistrate/जिल्हाधिकारी (Collector) यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. सर्व पात्र मुलांची आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली जाऊ शकते.

 

 

योजनेतील पात्रतेचे निकष
ज्या मुलांनी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला जागतिक महामारी (Corona Global Epidemic) घोषित केल्याच्या 11 मार्च 2020 या तारखेपासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावले आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील. यामध्ये कायदेशीर पालक/दत्तक पालक/एकल दत्तक पालक यांचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी, पालकांच्या मृत्यूच्या तारखेला मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

योजनेचा मुख्य हेतू
या योजनेचा मुख्य उद्देश आरोग्य विम्याद्वारे मुलांची काळजी घेणे, त्यांना शिक्षणाद्वारे सशक्त आणि सक्षम बनवणे हा आहे.
याशिवाय कोरोना महामारीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत,
अशा मुलांना वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाखांचे आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी करण्यासाठी सरकारने ही घोषणा केली आहे.

 

असे असेल मदतीचे स्वरुप
ही योजना इतर गोष्टींबरोबरच, या मुलांना दृष्टिकोन, शिक्षण, आरोग्यासाठी निधी, वयाच्या 18 व्या वर्षापासून मासिक स्टायपेंड आणि 23 वर्षाचे झाल्यावर 10 लाख रुपये एकरकमी मदत दिली जाईल.

 

कोठे आणि कशी करायची नोंदणी ?
पीएम केअर फॉर चिल्ड्रन ही योजना https://pmcaresforchildren.in या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.
सर्व राज्य States/केंद्रशासित प्रदेशांना (Union Territories) आता या पोर्टलवर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पात्र मुलांची ओळख करुन त्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे.
या पोर्टल मार्फत कोणताही नागरिक या योजनेंतर्गत पात्र बालकाची माहिती प्रशासनाला देऊ शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जर तुमच्या ओळखीत किंवा परिसरात अशी पात्र मुलं असतील, तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल माहिती देऊ शकता.
किंवा या पोर्टलवर सरकारला तुम्ही त्या मुलांची माहिती देऊ शकता.

 

Web Title :- PM Cares For Children Scheme | pm cares for children during corona period is helpful for this age group know the benefits

 

हे देखील वाचा :

NCP Nawab Malik Arrest | नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सिल्वर ओकवर खलबत सुरू!

Kirit Somaiya | ‘नवाब मलिकानंतर आता ‘या’ नेत्याचा नंबर’; मलिकांच्या अटकेनंतर सोमय्या पुन्हा गरजले!

Shilpa Shetty Fitness Video | शिल्पा शेट्टीनं व्हिडिओ शेअर करून महिलांना मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी दिल्या खास टिप्स, कॅप्शनमध्ये लिहिला मौल्यवान संदेश

 

Related Posts