IMPIMP

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात येऊ शकतो १३ वा हप्ता, असे तपासू शकता स्टेटस

by nagesh
PM Kisan | pm kisan samman nidhi yojna 13th installment can come in the account of farmers this week

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | मोदी सरकारने शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojna). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजाराच्या ३ हप्त्यात येतात. आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्याच वेळी, १३ व्या हप्त्याचे पैसे देखील या आठवड्यात येऊ शकतात. (PM Kisan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुमच्या खात्यात १३ वा हप्ता आला आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुमचे स्टेटस तपासावे लागेल. येथे ई-केवायसी आणि लँड सिडिंग व्यतिरिक्त पात्रता कॉलम तपासावा लागेल. या तीन कॉलमसमोर ‘येस’ लिहिले असेल तर पुढील हप्त्याचा लाभ मिळेल. मात्र या तीन कॉलमसमोर किंवा कोणत्याही एका कॉलममध्ये ‘नो’ लिहिलेले असल्यास तेराव्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

 

५ स्टेपमध्ये असे तपासा तुमचे स्टेटस :
स्टेप १ – किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जा. येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
Step २ – यानंतर Beneficiary Status चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप ३ – यानंतर स्कीम नोंदणी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर सबमिट करा.
Step ४ – यानंतर स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल. तो प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
स्टेप ५ – यानंतर तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल. येथे तुम्हाला E-KYC, पात्रता आणि लँड सिडिंगच्या पुढे लिहिलेला मेसेज तपासावा लागेल. यावरून पुढील हप्त्याचा लाभ मिळेल की नाही हे कळेल. (PM Kisan)

 

KYC अपडेट करूनही आले नाहीत पैसे तर हे करा :
ई-केवायसी अपडेट (E-KYC updates) केल्यानंतरही किसान सन्मान निधीचे पैसे खात्यात पोहोचले नाहीत,
तर यामागे आणखी काही कारणे असू शकतात. हप्ता खात्यात न आल्यास,
पीएम किसान टोल फ्री नंबर १८००११५५२६६, १८००११५५२६ किंवा हेल्पलाइन १५५२६१ वर कॉल करून चौकशी करू शकतात.
याशिवाय ०११-२४३००६०६, ०११-२३३८१०९२ या हेल्पलाइन क्रमांकांवरही संपर्क साधता येईल.
याशिवाय, तुम्ही अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PM Kisan | pm kisan samman nidhi yojna 13th installment can come in the account of farmers this week

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांना ‘धरणवीर’ पुरस्कार देणार, भाजप खासदाराची खरमरीत टीका

J. P. Nadda | चंद्रपूरातील सभेत भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

 

Related Posts