IMPIMP

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

by nagesh
PM Jan Dhan Yojana (PMJDY) | pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

नवी दिल्ली – वृत्त संस्थाPMJDY | जर तुम्ही प्रधानमंत्री जन-धन योजनेचे (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana) खातेदार असाल, तर तुम्हाला या सुविधेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, जी तुम्हाला बँकिंग सेवांमध्ये अनेक आर्थिक लाभ देते. (PMJDY)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या झिरो बॅलन्स अकाऊंटमध्ये तुम्हाला रु. 10,000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा मिळू शकते. ओव्हरड्राफ्ट मर्यादा आधी 5,000 रुपये होती, जी
नंतर दुप्पट करून 10,000 रुपये करण्यात आली. रु.2,000 पर्यंतचा ओव्हरड्राफ्ट कोणत्याही अटीशिवाय उपलब्ध आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान सहा महिने जुने असले पाहिजे, अन्यथा तुम्हाला फक्त रु.2,000 पर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकेल. ओव्हरड्राफ्टसाठी वयोमर्यादाही 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे.

खात्याच्या सहा महिन्यांच्या समाधानकारक वापरानंतर PMJDY खातेधारकांना रु. 5,000/- पर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध होईल. डुप्लिकेशन टाळण्यासाठी आधार क्रमांक देखील आवश्यक असेल. जर आधार क्रमांक उपलब्ध नसेल, तर बँका अतिरिक्त सावधगिरी बाळगतात आणि लाभार्थ्यांकडून एक घोषणापत्र देखील मागतात. 5,000/- पर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी, शक्यतो कुटुंबातील महिलेच्या एका खात्यात उपलब्ध आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

PMJDY खाते डायरेक्टर बनिफिट ट्रान्सफर (थेट लाभ हस्तांतरण), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), लघु युनिट विकास आणि पुनर्वित्त एजन्सी बँक (MUDRA) साठी पात्र आहेत.

लोकांना बँकिंग, रेमिटन्स, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या आर्थिक सेवां परवडणार्‍या दरात मिळाव्यात यासाठी हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले.

PMJDY शी संबंधित विशेष फायद्यांमध्ये ठेवींवरील व्याज, 1 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण,
किमान शिल्लक आवश्यकता नाही आणि संपूर्ण भारतभर पैशांचे सुलभ हस्तांतरण, यांचा समावेश आहे.

 

 

Web Title : PMJDY | pradhan mantri jan dhan yojana without any balance these people can get the benefit of up to 10 thousand rupees know how

 

हे देखील वाचा :

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

 

Related Posts