IMPIMP

PPF, NSC आणि सुकन्या समृद्धीच्या (SSY) गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी, सरकार छोट्या बचत योजनांवर वाढवू शकते व्याजदर

by Team Deccan Express
PPF NSC SSY | ppf senior citizen savings scheme sukanya samriddhi interest rates may hike soon know here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF NSC SSY | लाखो लोक भारतीय पोस्ट ऑफिसच्या (Indian Post Office) बचत योजनांमध्ये (Saving Scheme) गुंतवणूक करतात. या बचत योजना खुप लोकप्रिय आहेत, कारण यामध्ये कोणतीही जोखीम नाही आणि सरकार यावर सुरक्षेचे आश्वासन देते. सोबतच या योजनांवर व्याजसुद्धा सरकारी आणि प्रायव्हेट बँकांच्या योजनांपेक्षा जास्त मिळते. मात्र, मागील मोठ्या कालावधीपासून सरकारने (Modi Government) या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणतीही वाढ केलेली नाही. (PPF NSC SSY)

 

हे लक्षात घेता सरकार पुढील महिन्यात नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (National Saving Certificate), सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY), सिनियर सिटीझन बचत योजना Senior Citizen Saving Scheme (SCSS) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडसारख्या Public Provident Fund (PPF) छोट्या बचत योजनांच्या (Small Saving Scheme) गुंतवणुकदारांना खुशखबर देऊ शकते. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये (Media Report) सांगण्यात आले आहे की, सरकार जूनपासून या बचत योजनांवर व्याजदर (Interest Rate Hike) वाढवण्याचा विचार करत आहे. (PPF NSC SSY)

 

जूनमध्ये होईल व्याजदरांचे पुनरावलोकन

केंद्र सरकार (Central Government) दर तीन महिन्यांनी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन करते. मोठ्या कालावधीपासून त्यांच्या दरांमध्ये बदल झालेला नाही. मार्चमध्ये झालेल्या पुनरावलोकनात सुद्धा दरांमध्ये बदल केलेला नाही. आता पुढील पुनरावलोकन जूनमध्ये होईल. अशावेळी सरकार दर वाढवण्याची शक्यता काही कारणांमुळे व्यक्त होत आहे.

 

या कारणांमुळे वाढू शकतात दर

रिझर्व्ह बँकेने Reserve Bank of India (RBI) याच महिन्यात रेपो रेटमध्ये अचानक 40 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. यामुळे सर्व प्रकारची कर्ज महाग झाली आहेत. दुसरीकडे, गुंतवणुकदारांना यातून जास्त रिटर्न मिळू लागला आहे. सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) आणि रिकरिंग डिपॉझिटचे (Recurring Deposit) व्याजदर वाढवले आहेत. यातून सरकारवर छोट्या बचत योजनांमध्ये वाढ करण्याचा दबाव वाढला आहे.

 

सरकार या योजनांमध्ये गुंतवण्यात आलेल्या रक्कमेचा वापर पायाभूत संरचना क्षेत्रातील विविध योजनांमध्ये करते. जर बँकांचे व्याजदर छोट्या बचत योजनांपेक्षा जास्त झाले तर गुंतवणूकदार यातून बाहेर पडून बँकांच्या एफडी आणि आरडीमध्ये गुंतवणूक करू लागतील. यातून सरकारला भांडवलाची कमतरता भासू शकते. यासाठी सुद्धा बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

विविध बचत योजनांचा सध्याचा व्याजदर

– पीपीएफ – 7.0 टक्के

– राष्ट्रीय बचत पत्र, एनएससी – 6.8 टक्के

– सुकन्या समृद्धी योजना – 7.6 टक्के

– किसान विकासपत्र Kisan Vikas Patra (KVP) – 6.9 टक्के

– डाकघर बचत खाते Post Office Saving Account – 4 टक्के

– 1 – 3 वर्षापर्यंतचे टर्म डिपॉझिट – 5.5 टक्के

– 5 वर्षापर्यंतचे टर्म डिपॉझिट Term Deposit – 6.7 टक्के

– 5 वर्षापर्यंतची आरडी – 5.8 टक्के

– वरिष्ठ नागरिक बचत योजना – 7.4 टक्के

– 5 वर्षापर्यंत मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme) – 6.6

 

Web Title :- PPF NSC SSY | ppf senior citizen savings scheme sukanya samriddhi interest rates may hike soon know here

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts