IMPIMP

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | IIT च्या रिपोर्टमध्ये दावा – SBI ने आतापर्यंत परत केले नाहीत जन-धन खातेधारकांकडून वसूल केलेले 164 कोटी

by nagesh
PM Jan Dhan Yojana (PMJDY) | pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pradhan Mantri Jan Dhan Yojana | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI) ने एप्रिल, 2017 पासून डिसेंबर 2019 च्या दरम्यान पंतप्रधान जन-धन योजना म्हणजे पीएमजेडीवाय (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) च्या खातेधारकांकडून डिजिटल पेमेंटच्या बदल्यात वसूल केलेले 164 कोटी रुपयांचे अयोग्य शुल्क अजूनपर्यंत परत केलेले नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने (IIT Mumbai) जन-धन खाते (Jan Dhan Account) योजनेवर तयार केलेल्या एका रिपोर्टनुसार, हे शुल्क परत करण्याचे निर्देश सरकारकडून मिळाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत केवळ 90 कोटी रुपयेच खातेदारांना परत केले आहेत. अजून 164 कोटी रुपयांची रक्कम परत करणे बाकी आहे.

 

या रिपोर्टनुसार, SBI ने एप्रिल 2017 पासून सप्टेंबर 2020 च्या दरम्यान जन-धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या साधारण बचत खात्यातून यूपीआय आणि रुपे व्यवहारासाठी एकुण 254 कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क वसूल केले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यामध्ये प्रति व्यवहार बँकेने खातेधारकांकडून 17.70 रुपयांचे शुल्क घेतले होते. याबाबत स्पष्टीकरणासाठी पाठवलेल्या प्रश्नांना एसबीआयने कोणतेही उत्तर दिले नाही.

 

इतर खाजगी बँकांच्या उलट एसबीआयने जन-धन खात्यावर खातेधारकांनी केलेल्या डिजिटल व्यवहारासाठी शुल्क वसूल करण्यास सुरूवात केली होती. एका महिन्यात चार पेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यास बँक 17.70 रुपये प्रति व्यवहार शुल्क घेत होती.

 

एसबीआयच्या या पावलाने मोदी सरकारवर (Modi Government) कठोर टिका झाली होती.
यामुळे प्रकारामुळे डिजिटल व्यवहार करणार्‍या जन-धन खातेधारकांवर  प्रतिकूल परिणाम झाला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

CBDT ने शुल्क परत करण्याचे दिले होते निर्देश

या रिपोर्टनुसार, एसबीआयच्या या मनमानीबाबत ऑगस्ट 2020 मध्ये अर्थ मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली होती.
ज्यांनी दखल घेतली. सीबीडीटीने 30 ऑगस्ट 2020 ला बँकांसाठी सूचना जारी केली की,
1 जानेवारी 2020 पासून खातेधारकांकडून घेतलेले पैसे परत करावे.
याशिवाय भविष्यात अशाप्रकारचे शुल्क वसूल केले जाणार नाही असेही म्हटले होते.

 

Web Title :- Pradhan Mantri Jan Dhan Yojana | sbi yet to refund rs 164 crore undue fee charged from jan dhan account holders Pradhan Mantri Jan Dhan Yojana marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना दिल्या शिव्या; मालकाने केला कामगाराचा खून, प्रचंड खळबळ

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे ‘साऊंड’ चोरीला ! नगरसेवक सुभाष जगतापांचा डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट

Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा

 

Related Posts