IMPIMP

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM) | मोदी सरकारची मस्त योजना ! जन धन खातेधारकांनाही मिळणार 3 हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या

by nagesh
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM) | jan dhan account holders will also get a pension of rs 3000 from pradhan mantri shram yogi maandhan yojana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM) | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील सर्वसामान्य नागरीकांसाठी, शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणले आहे. दरम्यान, असंघटीत क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या नागरीकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM) आहे. या योजने अंतर्गत 45 आतापर्यंत लाखांहून जादा नागरीकांचा समावेश आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जन धन खातेधारकांना (Jan Dhan Account Holders) देखील या योजने अंतर्गत पेन्शन मिळू शकणार आहे. तर, 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यात, वयाच्या 60 वर्षांनंतर व्यक्तीला पुढील आयुष्यभर 3 हजार रुपये पेन्शन मिळत राहील. Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM)

 

कोणाला मिळणार लाभ?
या योजनेंतर्गत घरचे कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर यांना ही योजनेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ अशा कामगारांना दिला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा अधिक नाही.

 

या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. जे EPFO, NPS अथवा ESIC चे सदस्य आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी व्यक्तीने आयकर भरला तरी तो या योजनेसाठी पात्र नाही.

इतकी गुंतवणूक करावी लागणार?
समजा एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षे असेल, तर त्याला 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतिमहिना 55 रुपये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत जमा करावे लागतील. जर एखाद्याचे वय 29 वर्षे असेल तर त्याला योजनेत पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रतिमहिना 100 रुपये जमा करावे लागतील. समजा एखादा कर्मचारी वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर त्याला प्रतिमहिना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जेवढे योगदान खातेदाराचे आहे तेवढेच योगदान सरकारही आपल्या वतीने देणार आहे. (PM-SYM)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

कागदपत्रे –
– आधार कार्ड आणि बचत खाते / जन धन खाते (IFSC कोडसह) फक्त दोन कागदपत्रे आवश्यक.

– तुमचे जन धन खाते असले तरी तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.

 

अशी करा नोंदणी –
– पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी, जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.

– आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते जे काही असेल ते IFSC कोड सोबत द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल.

– खाते उघडण्याच्या वेळी नॉमिनी देखील प्रविष्ट केला जाऊ शकतो.

– तुमचा तपशील संगणकात टाकल्यानंतर, मासिक योगदानाची माहिती आपोआप प्राप्त होईल.

– तुम्हाला तुमचा पहिला हफ्ता रोख स्वरूपात द्यावा लागेल.

– तुमचे खाते उघडले जाईल आणि श्रम योगी कार्ड उपलब्ध होईल.

– 1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही या योजनेची माहिती मिळवू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :-  Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana (PM-SYM) | jan dhan account holders will also get a pension of rs 3000 from pradhan mantri shram yogi maandhan yojana

 

हे देखील वाचा :

EPFO | पीएफमधून 1 तासात तुमच्या बँक खात्यात येतील पैसे; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स घेण्याची पद्धत

Pune Crime | पहाटे मेडिकल दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले; कोंढव्यातील घटना

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’

 

Related Posts