IMPIMP

Prakash Ambedkar On Rajya Sabha Election | ‘… तर राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावाच लागेल’ – प्रकाश आंबेडकर

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar big claim over

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Prakash Ambedkar On Rajya Sabha Election | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र कोणत्याही पक्षाने अर्ज मागे न घेतल्याने चुरस वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले राज्यसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) नसून खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध (NCP) भाजप अशी आहे. आपला गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार राष्ट्रवादीला निवडून आणावा लागेल. या निवडणुकीत सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “या निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. त्याची किंमत आपण ऐकली नसेल इतकी असेल. इथली जनता हे पाहत आहे. राष्ट्रवादी बरोबर असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचे लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यताही वर्तवली.” (Prakash Ambedkar On Rajya Sabha Election)

 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपने उमेदवार उभा केला आहे. मुळात ही 6 वी जागा राष्ट्रवादीची आहे. या जागेवर यापूर्वी राष्ट्रवादीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना चांगला अभ्यास आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पाडण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रत्यक्षात भाजप – शिवसेनेतील लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी झाली आहे. ” असं ते म्हणाले.

 

“राष्ट्रवादीला जर गड वाचवायचा असेल तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडून आणावेच लागेल.
तसे नाही झाले तर राष्ट्रवादीच्या गडात भाजपचा प्रवेश झाला असे बोलले जाईल.
आणि राष्ट्रवादीला आव्हान देणे भाजपला सोपे जाईल. इथेनॉलचा परवाना हा केंद्राच्या हातात आहे.
त्यामुळे भाजप इथेनॉलचे लालूच राष्ट्रवादी बरोबर असलेल्या कारखानदारांना दाखवून राष्ट्रवादीला खिंडार पाडू शकतो,” असा दावाही आंबेडकर यांनी केला आहेे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Prakash Ambedkar On Rajya Sabha Election | prakash ambedkar said ncp will have to elect shiv sena candidate to maintain its stronghold rajya sabha election

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Monsoon Weather Update | उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; हवामान खात्याचा इशारा

Pune Crime | मालाची वाहतूक केल्यानंतरही पैसे न देता की 63 लाखांची फसवणूक; पी पी बाफना कंपनीचे संचालक प्रफुल्ल बाफना, योगेश बाफनासह 5 जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts