IMPIMP

Pune Crime News | ‘प्रत्येक महिन्याला 5 हजार दिले नाहीतर…’, पान टपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | पान टपरी चालकाकडे पाच हजार रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) अटक केली आहे. हा प्रकार (Pune Crime News) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेश सुनिल मोरे (वय-26), मयुर नारायण दारवटकर (वय-26 दोघे रा. संभाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार धीरज आरगडे हा फरार आहे. याबाबत पान टपरी चालकाने खंडणी विरोधी पथक एककडे तक्रार अर्ज केला होता.

 

आरोपींनी टपरी चालकाला चाकू लावून दोन हजार रुपये खंडणी घेतली होती. तसेच प्रत्येक महिन्याला पाच हजार दिले नाहीतर दुकान तोडून टाकण्याची धमकी दिली. याबाबत टपरी चालकाने 11 जानेवारी रोजी अर्ज केला होता. अर्जाची चौकशी केली असता आरोपींनी खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना गणेश मोरे आणि मयुर दारवटकर हे धनकवडी परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार भापकर यांना मिळाली. पोलिसांनी धनकवडी परिसरातून आरोपींना अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. पुढील तपाससाठी आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे
(ACP Gajanan Tompe) सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil), पोलीस अंमलदार संजय भापकर,
सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | ‘5 thousand paid every month or else…’, two arrested by crime branch for demanding extortion from Pan Tapri owner

 

हे देखील वाचा :

Mumbai Metro | ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेत ३६ महिन्यांचा विलंब; ‘तरीही कंत्राटदाराला ३६ लाखांचाच दंड मात्र…’

Pune Crime News | खुनाच्या तयारीत असलेल्या कोयता गँगला गुन्हे शाखेकडून अटक, कुऱ्हाड, कोयता, गुप्ती, तलवार जप्त

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला; म्हणाल्या – ‘विरोधातील दिवस देखील…’

 

Related Posts