Pune Crime News | रस्त्याने जाणार्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हॉटेलमधील काम संपवून घरी जात असलेल्या तरुणाला वाटेत अडवून कोयत्याचा (Koyta) धाक दाखवून लुबाडणार्या तिघांना पोलिसांनी (Pune Police) पकडले. (Pune Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
ओंकार संजय कसाळकर Omkar Sanjay Kasalkar (वय २०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी रोड, विश्रांतवाडी) याला अटक केली असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत गाणाराम वेण्णाराम देवासी (वय ३१, रा. हॉटेल मस्त कलंदर, ताडीवाला रोड, मुळ रा. राजस्थान) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३६/२३) दिली आहे. हा प्रकार बंडगार्डन रोडवरील तनिष्क ज्वेलर्स समोर सोमवारी मध्यरात्री एक वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी हे नुकतेच राजस्थानातून पुण्यात आले असून
हॉटेल हिडन पॅलेसमध्ये (Hidden Palace Hotel) वेटर म्हणून काम करतात.
सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी ताडीवाला रोडला जात होते.
वाटेत तनिष्क ज्वेलर्ससमोरील रोडवर तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल व खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघा अल्पवयीनांसह तिघांना पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे (Assistant Police Inspector Lingade) तपास करीत आहेत.
- तरुणाला अर्धनग्न करुन बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांवर FIR; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- धक्कादायक! पुण्यात पोलीस पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
- घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पार्ट टाईम नोकरीच्या अमिषाने दोघांची 32 लाखांची फसवणूक; विश्रांतवाडी, हडपसर पोलीस ठाण्यात FIR
Comments are closed.