IMPIMP

Pune News | पुण्यात शरद पवार समर्थकांनी नामदेव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं

November 18, 2023

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने शरद पवार समर्थकांनी आज प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांना काळे फासले. पुण्यातील नवीपेठ येथे हा प्रकार घडला. जाधव माध्यमांशी बोलत असताना हा प्रकार घडल्याने ही घटना पूर्णपणे चित्रित झाली आहे. जाधव यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाने संतप्त कार्यकर्त्यांपासून त्यांची कशीबशी सुटका केली. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्याचे तीव्र पडसाद आज पुण्यात उमटले. पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या समर्थकांमध्ये महिलांचाही समावेश होता.

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे नामदेव जाधव यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार समर्थकांनी विरोध केला होता. नामदेव जाधव कार्यक्रमाला आले तर तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. (Pune News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विरोध पाहून भांडारकर संस्थेने अचानक नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला.
परंतु, पुण्यात आलेले नामदेव जाधव नवीपेठ येथे माध्यमांशी बोलत असताना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक त्यांच्या तोंडाला काळे फासले.