IMPIMP

Pune Crime News | मी मोठा पोलीस अधिकारी.. महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध; 35 लाख रुपये उकळणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक

by sachinsitapure
Yavat Police Station

पुणे / दौंड : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने (Retired Police) महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून तिच्याकडून वेळोवेळी 35 लाख रुपये घेतले. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबवार यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मनीष बिलोन ठाकूर (रा. डिफेन्स कॉलनी, दौंड) याच्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. मनीष ठाकूरला यवत पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

आरोपी मनिष ठाकूर याने मी मोठा पोलीस अधिकारी आहे, असे पीडित महिलेला (Crime Against Women) सांगत होता. त्यामुळे तिने अनेक दिवस भीतीपोटी तक्रार केली नाही. अखेर मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. मनीष ठाकूर याने यवत परिसर व दौंड तालुक्यात (Daund) कोणाची धमकी देऊन फसवणूक केली असेल तर त्यांनी यवत पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts