IMPIMP

Pune Crime News | कोंढव्यात IPL Cricket मॅचवर Betting घेणार्‍या सट्टेबाजांच्या रॅकेटचा पर्दाफाश; पुण्यातील एका प्रसिध्द पबच्या मालकासह मुंबई, मध्यप्रदेश व दुबईतील बड्या बुकींचा समोवश

by nagesh
Pune Crime News | IPL Cricket Match Betting Racket Exposed in Kondhwa; An association of big bookies from Mumbai, Madhya Pradesh and Dubai along with the owner of a famous pub in Pune

पुणे : (नितीन पाटील) – Pune Crime News | पुण्याच्या कोंढव्यातील साईबाबा नगरमधील (Saibaba Nagar Kondhwa) धर्मश्री सिग्नेचर सोसायटीमधील (Dharmashree Signature Society) बंद फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या सट्टेबाजांचा पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell (AEC) Pune) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी फ्लॅटवर छापा टाकून सट्टेबाजांच्या मुसक्या अवळल्या असून तिघांना अटक करण्यात आले आहे (IPL Cricket Betting Arrest). दरम्यान, या सट्टेबाजांच्या रॅकेटमध्ये पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिध्द पबच्या मालकासह (Pub In Koregaon Park) मुंबई (Cricket Bookies In Mumbai), मध्यप्रदेश (Cricket Bookies In Madhya Pradesh) आणि दुबईतील (Cricket Bookies In Dubai) बुक्कींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी वसीम हनीफ शेख Wasim Hanif Shaikh (39, रा. फ्लॅट नं. 204, धर्मश्री सिग्नेचर सोसायटी, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला Ikrama Maqsud Mulla (26, रा. मदने सोसायटी, फ्लॅट नं. 16, घोरपडी पेठ, पुणे) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब Musabin Mehmood Bashaib (35, रा. 371, सोमवार पेठ, नरपतगिरी चौक, हनुमान मंदिराच्या मागे, पुणे) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिध्द पबचा मालक जितेश मेहता Pub Owner Jitesh Mehta (रा.पुणे) आणि मध्यप्रदेशातील बडा बुक्की अक्षय तिवारी Cricket Booki Akshay Tiwari (रा. इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरूध्द कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) भादंवि कलम 420, 34 तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 (अ), 5 सह भारतीय टेलीग्राफ अ‍ॅक्ट कलम 25(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक शंकर शिवाजी संपते Shankar Shivaji Sampate (बक्कल नं. 7812, नेमणुक – खंडणी विरोधी पथक-1, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार सुधीर इंगळे (Police Sudhir Ingle)
आणि शंकर संपते यांना काही बुक्की हे कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर
(Tata IPL Cricket Betting) मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे (Sr PI Ajay Waghmare), पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार सुधीर इंगळे, पोलिस अंमलदार शंकर संपते, पोलिस प्रदीप शितोळे, पोलिस विनोद साळुंखे, पोलिस सदोबा भोजराव, पोलिस संग्राम शिनगारे, पोलिस चेतन शिरोळकर, पोलिस सचिन अहिवळे, पोलिस सुरेंद्र जगदाळे आणि इतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धर्मश्री सिग्नेचर सोसायटीतील बंद फ्लॅटवर छापा टाकला. (Punyat Kondhyat IPL Ver Satta Ghenaryana Aatak)

 

अटक आरोपींसह जितेश मेहता (Jitesh Mehta Owner Of Punch Cocktail) आणि अक्षय तिवारी हे आपआपसात संगणमत करून टाटा आयपीएल 2023 क्रिकेटची मॅच पाहुन चालू असलेल्या दिल्ली कॅपीटल्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचवर ऑनलाइन पध्दतीने वेगवेगळया वेबसाईट आयडीव्दारे मोबाईल हॅन्डसेट व लॅपटॉपचा वापर करून जुगाराचा खेळ खेळवुन स्वतःच्या फायद्याकरिता सर्वसामान्य लोकांची फसवणुक करून ऑनलाईन क्रिकेट व इतर सट्टा खेळत आणि खेळविताना आढळून आले. पोलिसांनी 5 मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिसांनी मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी सुरू केली असून या रॅकेटमध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका प्रसिध्द पबचा मालक जितेश मेहता आणि मध्यप्रदेशातील बडा बुक्की अक्षय तिवारी याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या बुक्कींचे कनेक्शन दुबईला देखील असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | IPL Cricket Match Betting Racket Exposed in Kondhwa; An association
of big bookies from Mumbai, Madhya Pradesh and Dubai along with the owner of a famous pub in Pune

Related Posts