IMPIMP

Pune Crime News | पुणे: वारजे पोलिसांकडून दोघांना पिस्टलसह अटक, 7 काडतुसे जप्त

by sachinsitapure
Pistol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दहीहंडीच्या (Dahihandi) पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलिसांकडून (Pune Police) हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन दोन पिस्टल (Pistol Seized) आणि 7 काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) ही कारवाई (Pune Crime News) 25 ऑगस्ट रोजी केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सुरज शिवाजी भरडे (वय-23 रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राहुलनगर, शिवणे, पुणे), अनिकेत अनुरथ आदमाने (वय-21 रा. पाडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करीत होती. त्यावेळी पोलीस अंमलदार श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangre) यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सुरज भरडे व त्याचा अल्पवयीन साथिदार हे धनगरबाबा बस स्टॉपच्या मागील एनडीए मैदानावर (NDA Ground) उभे असून सुरज भरडे याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे (PSI Narendra Munde) व पथकाने सापळा रचून आरोपी सुरज भरडे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आणि 4 काडतुसे आढळून आली. तर अल्पवयीन मुलाकडे लोखंडी हत्यार मिळून आले. पोलिसांनी पिस्टल, काडतुसे आणि लोखंडी हत्यार जप्त केले आहे.

दरम्यान, ही करावाई सरु असताना पोलीस अंमलदार विजय भुरुक (Vijay Bhuruk) यांना अनिकेत आदमाने हा वारजे स्माशनभुमी समोरील पुलाखाली उभा असून त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे आहेत. तसेच त्याच्या अल्पवयीन साथिदाराकडे लोखंडी हत्यार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे (PSI Vishal Minde) व त्यांच्या पथकाने सापळा रचून अनिकेत आदमाने व त्याच्या साथिदाराला ताब्यात घेतले. अनिकेत याच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तर अल्पवयीन मुलाकडून लोखंडी हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी एकाच दिवशी दोन कारवाया करुन दोन पिस्टल, 7 काडतुसे, दोन लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे (Kothrud Division)
सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर
(Sr PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe), विशाल मिंडे (PSI Vishal Minde),
पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, अमोल राऊत, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे,
अमोल सुतकर व राहुल हंडाळे यांच्या पथकाने केली.

Related Posts